वास्तू शास्त्र

घरात माठ असल्याचे फायदे घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचं खूप स्वागत श्री स्वामी समर्थ. पूर्वीच्या काळी प्रेत्येकाच्या घरात पाणी पिण्याचे माठ होते उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा वर्षाचे बाराही महिने प्रेत्येक घरात माठातील पाणी पिण्याची सवय होती आणी त्या पाण्यामुळे कधीही कोणाला सर्दी पडसे होत नसे. नंतर घरोघरी फ्रीझ आले त्यानंतर पाण्याच्या बाटल्या फ्रीझ मध्ये ठेवून पाणी पिण्यास सुरवात झाली. आता आले आहेत प्युरिफाइर ज्यामुळे लोक डायरेक्ट पाणी नळाचे पितात. परंतु जी मजा मठाच्या पाणी पिण्यात असते ती कशातच नाही खर आहे कि नाही मित्रांनो.

आजही उन्हातून आल्यानंतर जर फक्त एक तांब्या माठातील पाणी पिले तर तहान भागतेच भागते परंतु गारवा हि वाटतो जे कि आपण फ्रीझ मधील पाणी पिल्यावर भागत नाही. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातीलच पाणी सर्व लोक पितात शहरात शक्यतो उन्हाळयात अडगळीत ठेवलेले माठ शोधून काढले जातात आणि मग त्याचा वापर होतो.

घरात माठ भरून ठेवणे ह्याचा वास्तुशास्त्राशी खूप निकटचा संबंध आहे. घरात भरून ठेवलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच घराच्या समृद्धीसाठी देखील मोठी कामगिरी बजावतो. चला तर जाणून घेऊयात ह्याचे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्वव काय आहे. वास्तूशास्त्रानुसार घरात असलेल्या मठामुळे घरातील अडीअडचणी व संकटे सहज सुटतात.

आपल्या संकटांचे व बाधांचे निराकरण करण्याचे कार्य मठामार्फत होत राहते. असे म्हणतात कि आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात पितरांचा वास असतो आणि पिण्याचे पाणीच जर भरून ठेवले नाही तर आपले पित्र कोठे वास करतील.

पूर्वीच्या काळी दररोज माठातील एक तांब्या पाणी घेऊन ते महादेवांच्या मंदिरात जाऊन ते महादेवांना अर्पण केले जात असे. ह्यामुळे आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे. आता असे काहीही राहिलेले नाही. आता घरात माठच राहिले नाहीत, त्यातून तांब्याभर जल वाहने ते तर दूरच राहिले. आपण जरी देवळात गेलो तरी आपण रिकामा तांब्या घेऊन जातो. तेथूनच पाणी घेऊन आपण महादेवांना अर्पण करतो मग पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच जातो.

हे पण वाचा :-  इंद्रजाल काय आहे ? कशासाठी त्याच उपयोग केला जातो घ्या जाणून.

ह्यामुळे घरातील कार्यात अडीअडचणी येत राहतात, भांडणे होतात. परंतु त्याचे कारण आपल्याला समजत नाही. जर आपण घरात माठ भरून ठेवतो तो नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावा, कारण पिण्याच्या पाण्याची दिशा हि उत्तरच आहे.

पाण्याचा माठ किंवा हंडा हे मोकळे होऊ देऊ नये. माठातील कमी पाणी देखील घरातील वादविवाद आणि भांडण तंटे ह्याचे कारण बनू शकते. जर पाण्याचे भांडे जर खाली गेले तर २४ तासात घरात वादविवाद होतात म्हणून पिण्याचे पाणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये.

घरात जर कोणाला ताणतणाव किंवा दडपण वाटत असेल तर अश्या व्यक्तीने माठातील एक तांब्या भरून घ्यावे व सलग आठ दिवस एखाद्या वृक्षाला घालावे ह्यामुळे त्या व्यक्तीचा तणाव दडपण दूर होते. आता लक्षात आले असेल कि घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्व आहे ते मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.