लाईफस्टाईल

पायाचे बोट मोठे असण्याचे संकेत काय, रहस्य काय आहे घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्या समुद्रशास्त्रात सर्वांचे महत्व आहे जसे कि होट, डोळे, केस, हात, पाय ह्या सर्वांवरुनच व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण लक्षात येतात. भविष्यात घडणाऱ्या बाबींचे ह्यावरून संकेत मिळतात. आजच्या लेखात आपण पायांच्या बोटांविषयी माहिती घेणार आहोत.

असे म्हणतात कि पाचही बोटे सारखी नसतात असे म्हणतात. प्रेत्येकाच्या बोटांची घडण वेगळी असते. शक्यतो आपल्या पायाची बोटे सारखी असतात, अंगठा थोडा जाड व बाकी बोटे बारीक बारीक होऊन अगदी शेवटचे बोट बारीक असते.

हि सर्व बोटे सरळ रेषेत किंवा किंचित तरकी असतात तर काहींच्या पायांची बोटे वाकडी तिकडी असतात. काही व्यक्तींच्या पायाचा अंगठा सर्वात मोठा असतो तर काहींच्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट सर्वात मोठे असते. पायाची बोटे लहान मोठी असणे ह्याचा प्रेत्येकाच्या बाबतीत काहीना ना काही अर्थ असतो. आपल्या विविध भागाच्या अंगावरून आपण खूप काही जाणून घेऊ शकतो.

व्यक्तीच्या शरीराच्या जडणघडणीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यटकीमहत्वव कसे आहे हे जाणून घेऊ शकतो. हि सर्व माहिती समुद्रशास्त्रात विस्तृतपणे दिलेली आहे. आजच्या लेखात आपण अंगठ्या शेजारील बोटाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट इतर बोटांपेक्षा मोठे किंवा लांब असेल तर त्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेणार आहोत.

पायाचा अंगठा गोलाकार असेल तर अश्या व्यक्तींना धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. समुद्र शास्त्रानुसार पायाच्या बोटांची तर्जनी म्हणजेच अंगठ्याशेजारील बोट अंगठ्या पेक्षा लांब असेल तर अश्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात. अश्या प्रकारच्या बोटांची रचना सौभाग्यसूचक मानले जाते. अश्या व्यक्ती भावुक असतात तसेच उत्साही देखील सुद्धा असतात.

अश्या व्यक्ती फार हुशार असतात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर फार यशस्वी होतात. अश्या व्यक्ती नेहमी अधिकार गाजवतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. अश्या व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. तर्जनी आणि अंगठा एका रेषेत असल्यास त्या व्यतकी कष्टाळू, मेहनत करणाऱ्या तसेच कामाप्रती प्रामाणिक असतात. समुद्रशास्त्रानुसार अंगठा आणि तर्जनी मध्ये अधिक अंतर असेल तर अश्या व्यक्ती आत्मवर्ण असल्याचे मानले जाते.

ह्या व्यक्तींना एकांतात जीवन व्यतीत करायला आवडते. ज्यांचे पाय लांब आणि टोकाकडून आखूड असतात त्या व्यक्ती आजूबाजूचे सौंदर्य पाहणे पसंद करतात. अश्या वक्तींना घराची सजावट करण्याचा छंद असतो. पायच्या बोटांवर चट्टे असणे म्हणजे भावनाशील व सवेंदनशील असतात.

समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या पायचे तळवे नाजूक व लालसर असतात अश्या व्यक्ती भाग्यवान असतात. भाग्याची भक्कम साथ त्यांना मिळते अश्या व्यक्तींना धन, मान सम्मान प्रसिद्धी ख्याती लोकप्रियता हे सर्व मोठ्या प्रमाणात प्राप्त होते.

अपायाच्या टाचेतील भेगा ह्या कामाच्या अधिक व्यापामुळे स्वतःच्या बाबतीत निष्काळजी देण्याचे संकेत मानले जाते. अंगठ्याच्या नखांची लांबी जास्त असल्यामुळे आपल्याला पाचन तसेच चयापचन संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचन क्रिया डगमगू शकते. तसेच नखांचे काठ वाकलेले असतील म्हणजेच तुम्ही तणावग्रस्त देखील असू शकता.

पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा लांब असेल तर अश्या व्यक्ती खूप चतुर व विचारात्मक असतात. ह्याउलट जर अंगठा लहान असेल तर अश्या व्यक्ती मल्टीटास्किंग असतात . मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट