लाईफस्टाईल

कोणत्या गोष्टी या देवावर सोडून द्यायच्या, काय आहेत त्यामागचे संकेत घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. अनेकांनी संतमहापुरुषांकडून किंवा पूर्वजांकडून ऐकले असेल कि देव सर्व काही पाहत असतो तो सर्व काही सुरळीत करेल म्हणून आपले कर्म चांगले ठेवा व बाकीचे देवावर सोडा. ह्या जगात आपण आयुष्याच्या काही अश्या वळणावर येऊन उभे राहतो कि अश्या वेळी आपल्याला काय करावे ते समजत नाही कधी कधी आपण इतके अस्वस्थ होतो कि आपण देवाजवळ जाणारा आपला मार्ग देखील डगमगायला लागतो.

त्यामुळे खरंच काही गोष्टी देवावर सोडल्या पाहिजेत का ह्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या लेखात करणार आहोत. मित्रांनो कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही घडते कि ज्याची आपल्याला अपेक्षा नसते. त्यावेळी आपण काय करावे समजत नाही जसे कि एक उदाहरण म्हणून जेव्हा आपले जवळचे मित्र आपल्याला सोडून जातात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो किंवा सर्वाधिक विश्वास ज्यांच्यावर असतो आणि त्यांच्याकडूनच आपला जेव्हा अपमान होतो किंवा फसवले जातो तेव्हा अश्या वेळी आपल्याला खूप त्रास व वेदना होतात.

अश्या वेळी आपण इतके नाकारात्मक बनून जातो कि आपल्याला जीवनच व्यर्थ वाटायला लागते. माणसाचा हा स्वभावच आहे जेव्हा माणसाच्या जीवनात सर्व काही चांगले सुरु असते तेव्हा आपण संसारात इतके गुंतून जातो कि आपल्याला देव देखील आठवत नाही. परंतु जेव्हा एखादे संकट आपल्यावर ओढवते तेव्हा मात्र आपण काय करू आणि काय नाही असे होऊन जाते.

मित्रांनो तुम्ही अनुभवले असेल कि माणूस हा सुखापेक्षा दुःखाबद्दल जास्त बोलतो. आपण इतके अस्वस्थ होतो कि त्या परिस्थितीला दोष देतो, अनेकजण असे म्हणतात कि आपली वेळच खूप वाईट होती. हि भावना आणखी बारकाईने समजून घेण्यासाठी तुलसीदासांची ह्या ओली काय सांगतात पाहुयात, माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपरेंत जे काही यश मिळवतो त्यात त्याचा काहीच हात नसतो त्यामुळे जेव्हा जेव्हा सृष्टिकर्त्याची इच्छा असते तेव्हा तेव्हा आपल्याला फायदा किंवा तोटा आपल्याला होतो, तसेच मान किंवा अपमान होत असतो तो आपल्याला सहन करायलाच लागतो.

शेवटी जीव जन्माला येतो व तो जीव परमपित्याच्या हातात असते. देव स्वतः असे देखील म्हणतात कि माझे जो कोणी मनापासून ध्यान करतो त्याच्या इच्छा तो पूर्ण करतो. म्हणून आपण आनंदी असूद्यात किंवा दुःखी आपण देवाचे नामःस्मरण सदैव करायला हवे. हळुवारपणे व शांतपणे आपण संकटाना सामोरे जायला हवे. काही वेळा कर्माचे फळ आपल्याला मिळते परंतु काही वेळा कर्माचे फळ मिळायला उशीर लागतो किंवा मिळत नाही म्हणून मानवाचे पुनर्जन्माचे चक्र चालूच राहते.

चांगल्या कर्माची व वाईट कर्माची फळे आपल्याला मिळत राहतात. जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण संयम ठेवायला हवा. संयमानी सर्व गोष्टीना सामोरे जाणे योग्य आहे. कधी कधी देवावर सर्व गोष्टी सोडून द्याच्या असतात कारण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात. आपण कोणाचेही वाईट करू नका किंवा कोणाबद्दल वाईट विचार देखील करू नका. भगवान श्री कृष्णांनी भगवत गीतेत देखील सांगितले आहे कि कर्म करत जावे व फळाची अपेक्षा ठेवू नये, माणसाच्या हातात फक्त कर्म करणे इतकेच आहे. फळाची अपेक्षा करणे मानवाला दुःखी करते.

मी तर नेहमी चांगले वागतो सर्वांसोबत मी तर चांगलंच वागतो ग माझ्या सोबत वाईट का घडते, ह्याचे कारण कधी कधी मागील जन्मातील फळ देखील आपल्याला ह्या जन्मी मिळत असते. आपण नेहमी समाधानी राहिले पाहिजे, आणि जीवनातील प्रेत्येक कठीण काळात आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे, प्रयत्न सोडून देणे ह्याचा अर्थ होत नाही.

आपण पूर्ण प्रयत्न करायलाच हवा, कारण देव देखील प्रयत्नांनाच यश देतो. माणसांनी आपले कर्म चांगले ठेवावेत व नियमित भगवंतांचे नामःस्मरण करावे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट