लाईफस्टाईल

कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशीबवान असतात.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशीबवान असतात. सुरवात करूयात रविवारपासून.

रविवार: ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते. त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. मित्रांनो ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात तत्यांचा प्रचंड राग येतो.

सोमवारी: ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश राहतात. कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो. आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. मित्रांनो ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही. मित्रांनो हि व्यक्ती आपल्या आई वरती खूप प्रेम करतात.

मंगळवार: ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली कि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. मित्रांनो ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इनामदार असतात. दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात. ह्यांना ऐषआरामाचे जीवन जगणे पसंत असते. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत. दुसऱ्यवरती सातत्याने इमानदारी बाळगतात.

बुधवार: ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते. त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात. हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात. हे लोक देवधर्म ची कामे जास्त करतात.

गुरुवार: ज्यांचा जन्म गुरवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे कि त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची हे त्यांना चांगले जमते. मित्रांनो दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगले जमते. ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात. ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात.

शुक्रवार: ज्यांचा जन्म ह्या वारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा, त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते. त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरीयस घेणार नाही अत्यंत जिन्दादील व्यक्ती असतात. ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.

शनिवारी: ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो, त्यांच्यावर शनी देवांची कृपा असते. त्यांच्यावर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. ह्या व्यक्ती अगदी मनमौजेपणे जगतात. एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत. दुसऱ्याची मन जिंकून घेणारी असतात. सतत हसमुख रहातात, आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्या मध्ये असते. जिथे जातात तिथल्याच होऊन जातात. म्हणून लोक त्यांच्यवरती प्रेम करतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट