धार्मिक

कोरोना काळात आपल्या कुटुंबाचे रक्षण आणि नातलगांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी करा हा स्वामींचा एक मंत्र जप

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो सध्याचा काळ हा संकटाचा काळ आहे आणि काही रोग पूर्ण विश्वभर संकटाचा थैमान घालत आहे. अश्या वेळी आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी. ह्या रोगापासून आपला बचाव नेमका कसा करावा देव ईश्वर तो आपल्या सोबत आहे ना. असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. अश्या वेळी मित्रांनो आपण दररोज घरात देवपूजा करा धूप दीप लावा कापराची धुरी संपूर्ण घरभर फिरवा. हे संपूर्ण उपाय आपल्या घराला आपल्या शरीराला रोगजंतूंपासून दूर ठेवतात. शासन वेळोवेळीच्या सूचना देत असते जसे कि वारंवार हात धुणे, बाहेर जाणे टाळणे गर्दी न करणे, मास्क चा वापर करणे ह्या सर्व गोष्टींचं पालन आपण करायला हवं अश्या वेळी आपण फक्त देवावर विस्वास ठेवून आपण अगदी बिनधास्त निर्धास्त जगण्याचा प्रयत्न करू नये. जी शासन दरबारची मंडळी असतात हि मंडळी जी काही नियम सांगतात त्यांचे पालन करावे अश्या वेळी देवाची परीक्षा पाहू नये.

आज आपण आपल्या लेखात संकटकाळी कोणत्या मंत्रांचा जप करावा ह्या विषयी बोलणार आहोत. आणि जिया आपण दररोज देवपूजा करत होता ती देवपूजा आपण सातत्याने करत चला, देवावर नितांत श्रद्धा असू द्या. आपल्या घरात जर कोणी आजारी पडले असेल तर ह्या रोगाला बळी पडले असेल तर ह्या रोगाला कोणी घाबरून जाऊ नका. देवावरची निष्ठा नितांत राहू द्या. सर्व औषध उपचार करा. कोणती हि कमतरता न ठेवता तुमच्या हातात जे जे आहे ते सर्व गोष्टी करा. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या गोष्टी ईश्वरावर सोडा. तो तुमचं तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतोच. आणि जे विधिलिखित आहे ते तर होणारच आहे. त्यात तुम्ही मी कोनही बदलू शकत नाहीत. ह्या कठीण प्रसंगीच आपली परीक्षा होत असते. आता जाणून घेऊयात कि ह्या कठीण प्रसंगी आपण कोणत्या मंत्राचे जप करणार आहोत ते आपण जाणून घेऊयात.

तुमचे जे कुलदैवत आहे तुम्ही ज्या ईश्वरावर श्रद्धा आहे तुमचे जे इष्ट दैवत जे आहे. अगदी त्या कोणत्याही देवतेचे मंत्रजप आपण करू शकता. जर तुम्ही मानत असलेला देवतेचे मंत्रजप तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्या देवतेच्या नावाचे उच्चारण जरी करत राहिला तरी चालेल. अगदी देवाचा नाव घेतले तरी चालेल. आणि स्वामी समर्थांच्या सर्व भक्तांसाठी आपण ह्या मंत्राचे जप दिवसातून एकदा तरी नक्की करावे हा मंत्र आहे. स्वामी समर्थ सारामृत पुस्तकात धुमावती मंत्र ह्या मंत्राचा जप करावा. ॐ श्री धुं धुं धुमावती स्वाहाः ! ह्या मंत्राचा जप आपण दररोज सकाळी देवपूजा करून झाली कि देवासमोर आपण बसून ह्या मंत्राचा जप आपण साधारण १०८ वेळा करावा.मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट