धार्मिक

दररोज संध्याकाळी आपण लावावा असा एक दिवा, घरात कुबेरदेवांच्या आशीर्वादाने धनदौलत येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण देवपूजा हि अपूर्ण आहे जर आपण दिवा लावला नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतांपर्यंत पोहचवण्याचे कार्य हे दिव्यामार्फत होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा.

आजच्या लेखात आपण दिवा लावण्याचे विशेष असे काही नियम जाणून घेणार आहोत. तेलाचा, तुपाचा दिवा केव्हा कधी कसा लावावा. दिवा अश्या पद्दतीने लावावा त्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल. तसेच कुबेर निरंजन दिवा आपण कसा व कुठे लावावा हे आपण आज जाणून घेऊयात ह्या दिव्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल.

घरात दिवा लावल्याने घरातील नाकारात्मक ऊर्जा हि नष्ट होते, दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करूनच लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेल गळणारा असू नये.

काही घरात दिव्यावरून तेल ओघळत असते आणि आपण तोच दिवा सतत लावला जातो. अश्या मुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. कारण जिथे स्वछता असते अश्याच ठिकाणी भगवंतांचा वास असतो. म्हणून दोन दिवे ठेवावेत, आणि तो आपण घासून पुसून लावावा.

काही घरात तुपाचा तर काहींच्या घरी तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात. काही घरात दिवा हा सुख समृद्धी साठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणुन लावला जातो. ज्यांच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र तुपात भेसळ येत असलयाने प्रेत्येकजण तेलाचा दिवा लावणे पसंद करतात. ज्या व्यक्तींच्या घरी गाईचे तूप काढले जाते त्यांनी असा दिवा अवश्य लावावा. ह्यामुळे अनेक फायदे होतात.

हे पण वाचा :-  मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू टाका अंघोळीच्या पाण्यात नशीब बदलून जाईल.

तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे माहिती नसते, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसान दायक ठरू शकते. तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा आपण नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा.

दिव्याची वात देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणे महत्वाचे असते. आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे. आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वाट पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वात असू नये. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो ती म्हणजे आपण एकत्रितपणे तेल व तूप असा दिवा कधीही लावू नये. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नये.

मित्रांनो नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छांची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा मात्र आपण त्यातील वात जी लावत आहोत ती आपण लाल रंगाची असावी श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावावा ह्यामुळे सर्व इच्छा पूर्तता होते तसेच धनलाभ देखील आपल्याला होतो.

मित्रांनो जर तुमच्या घरावर कोणते मोठे संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अश्यावेळी आपण हनुमानांसमोर दररोज लाल रंगाच्या वातीने चमेलीच्या तेलाचा तीन मुखी दिवा आपण लावावा ह्यामुळे आपल्यावर हनुमानांची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता.

मित्रांनो तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा त्यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होतात. तसे तर आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन दिवा लावावा. हा दिवा थोडा बसका व गोल असतो ह्याला पुढे चोचीसारखा शेप दिलेला असतो. हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो.

हे पण वाचा :-  हळदीच्या डब्यात हि एक वस्तू ठेवा, करणीबाधा, नजरदोष नाहीसे होतात.

हा दिवा लावल्यानंतर आपण त्यात एखादी लवंग किंवा एखादी काळी तीळ व तांदूळ किंवा फुलची एखादी पाकळी ह्यापैकी आपण कोणतीही एखादी वस्तू आपण त्यात टाकावी. काहीही न टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते. मित्रांनो हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नयेत त्याआधी त्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकावेत मग आपण दिवा लावावा. हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.