बातम्या

लागिरं झाल जी फेम जीजी म्हणजेच अभिनेत्री कमल ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

झी मराठी वरील लागीर झालं जी या मालिकेतून घराघरात पोचलेली आज्याची लाडकी जीजी म्हणजेच अभिनेत्री कमल ठोके यांचे नुकतेच निधन झाले आहे.
लागीर झालं जी या मालिकेत त्या आज्याच्या आजीची भूमिका साकारली होती. आज्याला लहानाचा मोठा करणारी हि आज्जी ची भूमिका महाराष्ट्रातल्या घरा घरात खूप प्रसिद्ध झाली होती व घरा घरातील प्रेक्षकांना आपलीशी वाटत होती.त्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले.

कमल ठोके ह्या त्यांचा एक्काहत्तर वर्षामध्ये पदार्पण केलं होत. लागीर झालं जी या मालिकेत काम करायच्या अगोदर त्यांनी मराठी चित्रपट तसेच बऱ्याच मालिकेत देखील त्यांनी काम केलं होत. परंतु जीजी ह्या पात्राने त्यांना खरी ओळख करून दिली होती पण आपल्या लाडक्या जीजी आज आपल्या मध्ये नाहीयेत देव त्यांचा आत्म्यास चिरशांती देवो.

निधनाचे खरे कारण आजून स्पष्ट झाले नसून, लागीर झालं जी मालिकेचे दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी सोशल मीडिया वरती कमल ठोके यांची पोस्ट शेयर करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. लागीर झालं जी या मालिकेतील कलाकार हि बातमी ऐकून भावुक झाले आहेत. दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी पोस्ट शेयर करून त्यानी लिहले आहे की “जिजे तुझी खूप आठवण येईल, लव्ह यू ” ह्या खाली कलाकारांनी कंमेंट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

एका बातमी वरून असे कळाले आहे की त्यांचा निधनाचे कारण हे कर्करोग होते. कमल ठोके ह्या त्यांचे मुलाकडे म्हणजे चि. सुनील ह्यांचाकडे बंगरुळ येथे होत्या. उद्या कराड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यस्वसंकार होतील. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे लहान असो किंवा मोठे जीजी चालत चालल्या की त्यांच्या भोवती गराडा पडत असत.जीजीच्या दुःखद निधनाची बातमी काळावर कराड शहराबरोबर बाकीच्या शहराबरोबर पूर्ण महाराष्ट्रमध्ये जीजीच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी आहे.जीजी तुम्ही सदैव कायमस्वरूपी जिवंत आहात तुम्ही आमच्या सर्वांच्या हृदयात कायम युगानयुग जिवंत राहाल, आम्ही आणि तमाम महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही जिजी.खरंच खूप दुःख वाटतय तुम्ही अस इतक्या लवकर सोडून जाल अस कधीच वाटलं नाही, तुमची खूप आठवण येईल जिजी.

मित्रांनो तुम्हाला जीजी ची भूमिका कशी वाटायची ते नक्की कंमेंट करून कळवा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट