घरगुती उपाय

शेवटचा श्रावण सोमवार तुमचा घरात येणार पैसा हा जाणाऱ्या पैश्यापेक्षा कमी असेल तर आजचा उपाय नक्की करा

नमस्कार मित्रांनो आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि ह्या दिवशी आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन एक छोटासा शब्द आपण बोलायचा आहे मित्रांनो जर तुमच्या हि घरात तुम्ही मिळवून आणलेल्या पैस्यांपेक्षा जास्त खर्च होत असेल म्हणजेच कमाईपेक्षा जर खर्च जास्त होत असेल तर ह्यामुळे हि समस्या दूर होते. वायफळ गोष्टींवरती पैसा खर्च होतो. आलेला पैसे कधी आला आणि कधी गेला हे देखील कळत नाही. अगदी त्याला पाय फुटले कि काय असे वाटू लागते. सोबतच ज्यांच्या घरात पितृदोष आहेत.

पितृदोष म्हणजे ज्यांच्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झाला असेल आणि आपल्या हातून कळत नकळत घडल्या चुकांमुळे आपले पित्र अप्रसन्न असतील नाराज असतील तेव्हा पितृदोष उदभवतात. घरात सतत वादविवाद, क्लेश, अशांती भांडणाचे वातावरण असते. लोक सतत घरात एकमेकांसोबत भांडत असतात. तर हा पितृदोष देखील हा उपायाने दूर होतो. हा उपाय कसा करायचा हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मित्रांनो हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही केला तरी चालेल. ह्यासाठी तुम्ही घरातून एक तांब्या भर जल शिव मंदिरात जायचे आहे आणि हे तांब्याभर जल आपण महादेवांच्या शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहे. अर्पण करताना स्वधा स्वधा ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. मित्रांनो शिवलिंगाचा अभिषेख करताना आपण ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. त्यानंतर महादेवांच्या समोर आपण नतमस्तक होऊन महादेवांना आपली जी काही अडचण असेल जी काही समस्या असेल ती आपण बोलून दाखवायचे आहे.

त्या समस्यांतून आपल्याला मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करायची आहे. धन टिकत नाही ते धन टिकू दे धनात वृद्धी होऊ दे असे बोलायचे आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वधा स्तोत्राचा पाठ देखील अवश्य करावा. स्वधा स्तोत्र हे तुम्हाला इंटरनेट वरती सहज उपलब्ध होईल. तर मित्रांनो असा साधा सोपा उपाय आपण श्रावणातील अंतिम सोमवारी नक्की करा. महादेवांची अस्सीम कृपा आपल्यावरती नक्की बरसेल. मित्रांनो कंमेंट मध्ये हर हर महादेव लिहण्यास विसरू नका.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट