नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ह्या दररोजच्या जीवनात अगदी लहानश्या कितीतरी घटना घडत असतात. जसे कि भांडे पडणे दूध उतू जाणे ह्यासारख्या मात्र ह्यांचा आपल्या भविष्याशी किंवा येणाऱ्या प्रसंगाशी काही तरी संबंध असेल असे आपल्याला वाटत देखील नाही मात्र दूध उतू जाणे ह्यातही खूप मोठा अर्थ आहे जर तुम्ही कितीही मोठे काम केले तरी दूध तावताना जर तुमचे दूध जर उतू जात असेल, ते फरशी वर सांडत असेल किंवा गॅस वर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे.
ह्यचाच अर्थ तुम्हाला काही तरी चांगली बातमी मिळणार आहे दूध उतू जाणे ह्याचा अर्थ तुमचे घर दूधदुप्त्याने भरलेलं आहे, श्री कृष्णची नागरी वृंदावनात गाई असत म्हणून सगळ्यांच्या घरी दही दूध तूप ह्यांचे माठ भरलेलं असत. ते सर्व अगदी आनंदी उत्साहात असत गोकुळात जणू दही दूध उतू जात असे त्यामुळेच दूध उतू जाणे म्हणजे गोकुळाप्रमाणेच घर भरल्यासारखे असते. आजकालची पिढी ह्यावर विश्वास ठेवत नाही ते म्हणतात हे सर्व अंध श्रद्धा आहे. मात्र आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद हे खूप जुने आहे.
आपल्या ऋषींनी खूप अभ्यास करून, सर्वांचा सारासार विचार करूनच आपली मते प्रकट केली आहेत. जे भविष्य मानतात ते हे नक्कीच मानतील. दूध उतू गेल्याने सुख समृद्धी मिळते, मानसम्मान प्राप्त होतो. जर एखाद्या कामात जर काही अडचण आल्यामुळे जर बंद पडले असेल तर ते देखील काम तुमचे सुरु होते. तसेच अनेक लाभदायक घटना घडत असतात. परंतु जर दूध एखाद्या भांड्यात जर ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून सांडले तर ते एक दुर्घटनेचे संकेत असतो.
दुर्घटना हि लहान किंवा मोठी असू शकते, कधी ती शारीरिक नसून मानसिक किंवा आर्थिक देखील असते मात्र दुर्घटना घडते. काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे म्हणून काही लोक मुद्दाम उतू घालवतात मात्र मित्रांनो हे चुकीचे आहे ह्यामुळे अपशकुन घडतो. घरात भांडण तंटे तसेच कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कोणाचे लक्ष दुधाकडे नसताना ते चुकून उतू जाणे हे मात्र शुभ असते. म्हणून मुद्दाम तुम्ही स्वतः दूध उतू जाऊ देऊ नका.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




