नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाइट वरती श्री स्वामी समर्थ. मित्रांनो असे म्हणतात कि चाणक्य नितीमधील उपदेश जो कोणी आचरण करतो त्याची कधीही फसवणूक होत नाही आणि त्या व्यक्तीला प्रेत्येक कार्यात जास्तीत जास्त यश मिळते. चाणक्य सांगतात कि बुद्धिमान आणि हुशार माणसाने प्रेत्येकाकडून काही तरी शिकले पाहिजे.
मग तो प्राणी असो किंवा माणूस असूद्यात. चाणक्यांनी अनेक प्राण्यांकडून काय शिकायचे सांगितले आहे त्यातीलच गाढव हा एक प्राणी आहे. आजच्या लेखात आपण गाढवाकडून अश्या ३ गोष्टी शिकणार आहोत ज्या आपल्याला जीवनात प्रगती करायला मदत करतील.
मित्रांनो तुम्हाला हा श्लोक माहिती आहे का सुश्रान्तोऽपि वहेद् भारं शीतोष्णं न पश्यति। सन्तुष्टश्चरतो नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात्॥ पहिली गोष्ट गाढव हा कधीही थकला तरी तो ओझे उचलायचे काम चालू ठेवतो आणि आपले ठिकाण जो पर्यंत येत नाही टोपरेंत चालत राहतो तसेच माणसाने देखील कितीही थकवा आला तरी माणसाने आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धी साठी प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजेत.
असे होऊ शकते कि ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल, अश्या वेळी तो खूप वेळा निराश होऊन हार मानन्याच्या गतीला येतो परंतु गाढवाप्रमाणे न थकतापुढे चालत राहते त्याप्रमनी माणसांनी देखील सर्व संकटांचा सामना करत पुढे चालत राहिले पाहिजे.
दुसरी गोष्ट गाढव कोणताही ऋतू असूद्यात त्याची पर्वा करत नाही गाढव आपले काम सातत्याने करत राहते त्याच्यावर कोणत्याही ऋतूचा फरक पडत नाही अश्याप्रकारे माणसांनी देखील आपल्या लक्ष गाठण्याकरिता कोणत्याही ऋतूची पर्वा न करता सतत काम केले पाहिजे बऱ्याच लोकांना करणे द्याची सवय असते जसे कि ऊन आहे किंवा खूप थंडी आहे आता पाऊसच येतोय त्या मुळे ते लोक कामाची टाळाटाळ करतात. पण बुद्धिमान माणसाने ऋतू गरम आहे कि थंड ह्याचा विचार न करता मार्गक्रमण केले पाहिजे.
तिसरी गोष्ट गाढवाला जे काही खायला भेटते ते गाढव चरत राहते तसेच माणसाने देखील त्याला जे काही भेटले आहे त्यात त्याने संतुष्ट राहावे समाधानी राहावे चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशील राहावे. लोकांना सतत काही ना काही छोट्या गोष्टींवरती रडायची सवय असते. माझ्या कडे हे असते तर मी केले असते, तर माझ्या कडे हे असते तर ते केले असते अशी माणसे कधीही आयुष्यात पुढे जात नाहीत. त्यांना कीतीही दिले तरी त्यांची हाव संपत नाही. म्हणून माणसाने आहे त्या परस्थितीत संतुष्ट राहावे आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशील राहावे.
मित्रांनो ह्या होत्या चाणक्यनीतीवरील काही गोष्टी ज्या आपण गाढवाकडून शिकायला हव्यात, मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




