Shani Amavasya
धार्मिक

शनिश्र्चरी अमावस्याच्या दिवशी या ठिकाणी लावा तेलाचा दिवा. कामातील अडथळे होतील कमी.

येत्या शनिवारी येणारी अमावस्या हि शनिश्र्चरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी आपण काही छोटे छोटे उपाय केल्यास आपल्याला येणाऱ्या अडचणी कमी होतात. तसेच आपल्या घरा जवळ जर का शनी देवाचे मंदिर असेल तर अवश्य मंदिरात त्या दिवशी जाऊन यावे. तसेच त्यांना तेल अर्पण करावे. तसेच असे सुद्धा बोले जाते या शनी देवाच्या डोळ्यात पहाण्याची चूक करू नये. यामुळे साडेसाती आणि शनीची अडीचकी पाठी मागे लागू शकते.

आपण कोणत्याही शनी मंदिरात गेल्यावर शनी देवाचे दर्शन आपण मान खाली घालून घेतले पाहिजे. तसेच शनिवारी येणारी शनिश्र्चरी अमावस्या हि संपूर्ण दिवस आणि रात्र असणार आहे. आज आपण यादिवशी म्हणजे शनिश्र्चरी अमावस्यादिवशी काही प्रभावशाली छोटे छोटे उपाय कसे करायचे आणि त्याचे लाभ या बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष आहेत. साडेसाती असेल अडीचकी असेल तसेच राहू केतू ग्रहांचा दोष असेल अशा व्यक्तीनी हे छोटे उपाय केल्यास या असून मुक्ता मीळते. शनिश्र्चरी अमावस्याच्या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या गरीब व्यक्तीला अवश्य अन्न दान नक्की करावे. अन्न हे श्रेष्ठ दान समजले जाते. जर का अन्न दान जमत नसेल तर आर्थिक किंवा कपडे किंवा त्यांना उपयोगात येणाऱ्या वस्तू अवश्य दान म्हणून द्यावेत.

यादिवशी आपण स्वयंपाक करताना पहिली भाकरी किंवा पोळी हि गाय साठी तयार करून त्यांना खायला द्यावी. तसेच शेवटची पोळी किंवा भाकरी हि कुत्र्यांसाठी तयार करावी. तसेच पशु पक्षांसाठी अन्नाची व्यवस्थ करावी. या दिवशी मांसाहारी पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे. तसेच या दिवशी कोणत्याही वाईट गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या.

शनिश्र्चरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरच्या जवळ असलेल्या शिव मंदिरात जाऊन एक तांब्या जल अर्पण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. आणि महिलांनी नमः शिवाय ओम असा मंत्र जप करावा.

ज्या व्यक्तींना शनी दोष असेल म्हणजे साडेसाती किंवा अडीचकी अशा व्यक्तीनी मोहरीचे तेल दान करावे. जर का दान करणे शक्य नसेल तर शनी मंदिरात जाऊन मोहाचे तेल अर्पण करावे. बऱ्याच लोकांना कामात अडथळे निर्माण होत असतात अशा व्यक्तीनी उडीत घ्यावे ते उडीत काळ्या रंगाच्या कापडात बांधून आदल्या दिवशी झोपताना उशी खाली ठेऊन झोपावे आणि दुसऱ्या दिवशी हि पुडी पिपळ्याच्या झाडाखाली ठेऊन दयावे. यामुळे शनीचे दोष कमी होतात आणि नेहमी कामात येणाऱ्या अडचणी पासून मुकतात मिळते.

शनिश्र्चरी अमावस्याच्या दिवशी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. हा दिवा पिपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. या दिव्या मध्ये मोहरीचे तेल घ्यावे तसेच यात थोडे काळे उडीत आणि काळे तीळ अवश्य टाकावे. हा दिवा सायंकाळी पिपळ्याच्या झाडा खाली लावावा. तसेच अजून एक दिवा हा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावल्यास सुद्धा त्याचा लाभ चांगला मिळतो. पण एक गोष्ट लक्षात असुद्या कोणत्याही प्रकारचा दिवा लावताना त्या दिव्य खाली आसन नक्की तयार करा. जसे कि अक्षदा किंवा फुलांच्या पखळल्या यांच्या पासून तयार केलेले आसन सुद्धा चालते. शनिश्र्चरी अमावस्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय नक्की करून पाह तुम्हला यांचा लाभ नक्की होईल.

हे पण वाचा: या दिशेला पाय करून झोपल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट