धार्मिक

१ मार्च मंगळवार महाशिवरात्री ह्या दिवशी आले आहेत ४ महाशुभमुहूर्त, ह्या काळात घ्या शंकरांचे दर्शन.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत, जय भोलेनाथ. मित्रांनो १ मार्च मंगळवारी वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री आहे. हा दिवस विशेष विधी व कार्यांचा दिवस आहे. ह्या दिवशी केलेली शिवपूजा फलदायी सुख समृद्धी मिळून देणारी मानण्यात येते. जरवर्षी कृष्णपक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस भगवान शिवशंकर व माता पार्वतीचा सर्वात मोठा दिवस आहे. ह्या दिवशी शिवशंकर व माता पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. तुम्ही जर ह्या दिवशी व्रत करत असाल तर आजचा लेख पूर्ण अवश्य वाचावा.

शिवपुराणानुसार असे मानले जाते कि शिवरात्रीच्या रात्री अधिदेव भगवान शिवशंकर करोडो सूर्याच्या प्रभावाने शक्तिशाली शिवलिंगाच्या रूपात अवतरित झाले होते. म्हणूनच ह्या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. ह्यावेळी हि रात्र मंगळवारी आलेली आहे, जर तुम्ही ह्यादिवशी व्रत केले असेल तर आपण ह्या दिवशी शिवलिंगाची पूजा अवश्य करा. पण त्याआधी आपण काही काळजी मात्र अवश्य घ्या. महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाची पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात.

ह्यावेळी महादेव शिवलिंगात स्वतः विराजमान असतात आणि अश्या वेळी आपण शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होते. यंदा महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त त्याचा प्रारंभ पहाटे ३:१६ मिनीटांनी सुरु होईल व तो चतुर्दशी बुधवार सकाळी १० वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीला चार प्रहरात चरणात पूजा केली जाते. पूजेला ४ शुभमुहूर्त आहेत.

पहिला मुहूर्त हा १ मार्च रोजी संध्यकाळी ६:२१ मिनिटांपासून ९:२७ मिनटांपर्यन्त आहे. दुसऱ्या टप्यातील पूजा हि ९:२७ मिनिटांपासून १२:३३ मिनटांपर्यन्त आहे. तिसऱ्या मुहूर्तातील शुभ वेळ २ मार्चला आहे रात्री १२:३३ मिनिटांपासून ३:३९ मिनटांपर्यन्त आहे आणि चौथ्या मुहूर्तातील शुभ वेळ २ मार्चला आहे पहाटे ३:३९ मिनिटांपासून ६:४५ मिनटांपर्यन्त आहे.

महादेवांची पूजा कशी करावी हे जाणून घेऊयात. सकाळी लवकर उठून स्नान स्वच्छ कपडे परिधान करून महादेव व माता पार्वती समोर व्रताचा संकल्प करावा, ह्यानंतर शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध ह्याने अभिषेख करावा. महादेवाला बेलाची पाने, भस्म, धोतऱ्याची फुले, चंदन अक्षदा इत्यादी अर्पण करा. धूप व दीप लावून महादेवांच्या नामाचा जप करावा. शिवस्तुप्त व शिवस्तोत्राचे पठण करावे. काही चुका कधीही करू नका.

जसे कि चंपा किंवा केतकीची फुले त्यांना चुकूनही अर्पण करू नका. महादेवांच्या पूजेत तुळशीचा वापर करणे अमान्य आहे, त्यामुळे तुळशीचा नेवैद्य दाखवू नये. ह्या दिवशी आपण पूजेत तुटलेल्या तांदळाच्या अक्षदा वापरू नयेत. अश्या प्रकारे आपण सर्व पूजा करताना काळजी घ्यावी, सर्व शिवभक्ताना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट