बातम्या

मकरसंक्रांत साजरी करा ह्या पद्धतीने.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आता मकरसंक्रांत हा सण येतो आहे आणि ह्या दिवशी नेमके काई करायचे हा प्रश्न सगळ्यांचा मनात येत असतो, तर तुम्हाला हि मकरसंक्रांत कशी साजरी करावी हे माहित करून घ्याचे असेल तर आजचा आपला लेख पूर्णपणे वाचा. श्री स्वामी समर्थ..!! मित्रांनो मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वांनी मग तो स्त्री असो अथवा पुरुष सूर्यदयापूर्वी आपल्या अंथरुणातून उठून सर्वप्रथम आपण अंघोळ करून घ्यावी. ह्या दिवशी तीळ स्नानच फार महत्व आहे असे म्हणतात कि तीळ स्नान केल्याने रूप व आरोग्य लाभते. म्हणून आपण जेही पाणी आंगोळी साठी घेता त्यात चिमूटभर तीळ नक्की टाका तसेच तिळाचे उठणे लावून स्नान केल्याने आरोग्यप्राप्ती देखील होते. ह्या दिवशी तीर्थस्थळी मंदिर देवळात देवदर्शन करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व देखील असते. ह्या दिवशी स्नान झाल्यावर सूर्यदेवतेची पूजा आराधना मनोभावे करावी.

तांब्याचे भांडे घ्यावे व त्यात हळद, कुंकू, अक्षदा व थोडेसे तीळ आणि लाल रंगाचे कोणतेही फुल टाकून सूर्य देवतेला अर्ग्य द्यावे असे केल्याने तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांशा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील सूर्याला अर्ग्य दिल्यानंतर पाण्यात तीळ घालून पित्र्यांना जल घालून पाणी अर्पण करावे असे केल्याने पितृदोष असतील तर ते नाहीशे होतात. ह्या दिवशी दान करण्याला फार महत्व दिले आहे. ह्या दिवशी तूप, डाळ, वस्त्र , तांदळाची कच्ची खिचडी दान करण्याचे फार महत्व असते म्हणून ह्या दिवशी ह्यापैकी एकतरी कसलेही दान अवश्य करा.

मित्रांनो नंतर पूर्व दिशाकडे आपले तोंड असेल असे बसावे व समोर चौरंगावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र पसरवून त्यावर सूर्य देवाचे चित्र व प्रतिमा किंवा सूर्य यंत्राची प्रतिमा स्थापन करावी व त्या प्रतिमेची किंवा त्या यंत्राच्या फोटो ची पंचोपचार पूजा करून सूर्य देवतेला गुळाचा नैवैद्य दाखवावा. पूजनात लाल रंगाचे फुल अर्पण करावे व लाल रंगाच्या चंदनाच्या माळेने ह्या एका मंत्राचा जाप करावा तो मंत्र म्हणजे ओम भास्कराय नमः ! हा मंत्र तुम्ही १०८ वेळा म्हणजेच एक माळ करावा ह्या दिवशी भोजन खाऊ घातल्याने तुमच्या घरात धनाची कधीहि कमी होणार नाही ह्या दिवशी गूळ आणि कच्चे तांदूळ पाण्यात वाहने देखील खूप शुभ मानले जाते. ह्या दिवशी खिचडी, तूप , गूळ , तीळ आणि शिजवलेल्या तांदळात म्हणजेच भातात गूळ आणि दूध मिसळून खाल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. तर ह्या अश्या पद्धतीने तुम्ही मकरसंक्रांत आपली साजरी करा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट