लाईफस्टाईल

थंडीत उजळदार त्वचेसाठी घराच्या घरी बनवा फेशियल, अगदी घरातील गोष्टी वापरून.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखात आपण घराच्या घरीच फेशिअल कसे करू शकतो तसेच तुमची डल स्किन जी आहे ती कशी चमकदार कशी करू शकतो हिवाळ्यात आपल्या त्वचेला चमकदार कसे बनवायचे हे आपण आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. कोणत्याही नवीन कार्यक्रमासाठी तसेच सणासाठी आपण आपला चेहरा तजेलदार व चमकदार बनवण्यासाठी आपले आजच्या फेशिअल च्या स्टेप्स पूर्ण वाचा.

स्टेप पहिली आहे ती म्हणजे क्लीनजिंग ची ह्यामध्ये आपण घेणार आहोत २ चमचे दूध व त्यात आपण टाकणार आहोत ३ ते ४ लिंबाचे थेंब. हे छान मिक्स करून आपण कॉटन च्या साह्याने आपण लावून घ्याचे आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण लावल्यानंतर आपण हलक्या हाथाने मसाज करायचे आहे. ह्या स्टेप मुळे तुमचे पोवर्स छान धुवून निघतात तशीच त्वचा देखील छान स्वच्छ होते. हे झाल्यानंतर आपण आपला चेहरा ओल्या फडक्याने पुसून घ्याचा आहे, किंवा धुवून घ्या.

दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग ह्यासाठी आपण कोणत्याही ब्रँड ची एक चमचा कॉफी पावडर घ्याची आहे त्यानंतर एक चमचा आपण त्यात तेल टाकायचे आहे तेलासाठी ऑपशन आहेत जसे कि ज्यांची स्किन हि कोरडी आहे त्यांनी ऑलिव्हर ऑइल तीळ तेल वापर व ज्यांची त्वचा ऑईली आहे त्यांनी बेबी ऑइल वापरले तरी चालेल किंवा ऑलिव्हर ऑइल वापरले तरी चालेल.

तर अश्या पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स करून घ्या व ते आपण हाताच्या सहाय्याने चेहऱयावर स्क्रब करून घ्या विशेषतः आपण आपल्या हनुवटी व नाकाजवळील स्किनजवळ स्क्रब करा. तिथे ब्लॅक हेडस व व्हाईट हेडस जास्त प्रमाणात असतात. ह्यामुळे आपले सर्व डेड स्किन निघून जाते. स्क्रब झाल्यानंतर आपण आपला चेहरा धुवून घ्याचा आहे.

त्यानंतरची स्टेप आहे वाफ घ्याची तर व्यवस्थित आपण पाणी गरम करून पाण्याची वाफ घ्या ह्यामुळे आपले पोअर्स मोठे होतात व आपल्याला डेड स्किन किंवा ब्लॅक हेडस काढणे सोपे जाते. अश्या पद्धीत्ने वाफ केल्यानंतर हे असे सर्व ब्लॅक हेडस काढून घ्या त्यानंतर आपण चेहरा आपण धुवून घ्या आता चौथी स्टेप आहे ती म्हणजे मसाजिंग ह्यासाठी आपण घेणार आहोत एलोवेरा जेल एक चमचा.

त्यानंतर ग्लिसरीन एक चमचा व तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे फ्रेश क्रीम ती हि एक चमचा अश्या पद्धतीने सर्व मिश्रण एकत्रित छान मिक्स करून घ्या व ते मिश्रण आपण आपल्या चेहरयावर लावून घ्या ह्यामध्ये ग्लिसरीन सर्वात महत्वाचे घटक आहे कारण हे तुमचे मोईस्चर परत आणते जे कि थंडीमध्ये खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण फ्रेश क्रीम घेतली आहे त्यात लॅक्टिक ऍसिड जे कि त्वचा उजळण्यासाठी मदत करते. हे सर्व मिश्रण लावल्यानंतर आपण चांगल्या पद्दतीने मसाज करून घ्या.

मसाज करताना आपण लक्षात ठेवा कि आपण वरून खाली हाथ फिरवा ज्यामुळे आपन जे घटक घेत आहोत ते सर्व चांगले ऍबसॉरब होतात. त्यानंतर आपण आपला चेहरा धुवून घ्याचा आहे. त्यानंतर ची स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक ची ह्यात आपण घेणार आहोत चंदन पावडर २ चमचे, ४ चमचे दूध, एक चमचा हळद, व एक व्हिटॅमिन इ कॅप्सूल तर असे हे एक पूर्ण कॅप्सूल आपण वापरायचे आहे.

असे सर्व मिक्स करून अप हे चेहऱ्याला लावायचे आहे.चंदन पावडर हि आपल्या स्किन वरील डार्क स्पोट कमी करते तुमच्या चेहऱ्याला उजळ बनवते. तसेच जे आपण व्हिटॅमिन इ कॅप्सूल वापरत आहोत त्यामुळे आपल्या स्किन ला मोईस्चर मिळते हळदीने स्किन उजळते. अश्या पद्धतीने आपण २० मिनटांपर्यंत आपण तो ठेवून चेहरा धुवून घ्याचा आहे.

चेहरा धुतल्यानंतर आपल्याला आपलं उजळलेला व चमकदार चेहरा पाहाल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट