गावरान हरभऱ्याची भाजी करण्याची योग्य पध्द्त जाणून घ्या.
फूड

गावरान हरभऱ्याची भाजी करा या पद्धतीने. अशा पद्धतीने करा हरभऱ्याची भाजी.

गावरान हरभऱ्याची भाजी कशा पद्धतीने करायची याबद्दल जाणून घेणार आहोत. लवकरात लवकर हरभऱ्याची भाजी कशा पद्धतीने करता येईल तसेच तितकीच चविष्ट भाजी कोणीच खाल्ली नसे अशी रेसेपी आपण जाऊन घेणार आहोत. हि हरभऱ्याची भाजी कमी वेळेत करता येणारी असून त्याची कृती सुद्धा खुप सोपी आहे. गावरान हरभऱ्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा जाऊन घेऊ.

हरभऱ्याची भाजी साठी साहित्य

सुरवातीला आपल्याला एक मसाल्याची चटणी तयार करायची आहे. साठी काही साहित्य लागणार आहे. थोडा मोठ्या आकाराचा कांदा चिरुन घ्या त्याच्या फोडी मोठ्या घेतल्या तरी चालते. त्या नंतर आठ ते दहा लसुण पाकळ्या, अद्रक छोट्या दोन फोडी, पाच ते सहा काळ्या मिऱ्या, आणि एक एकचमच्या जिरे घ्याचे आहे आणि कोथींबीर थोडी टाकायची आहे आणि थोडे पाणी गरज लागल्यास टाकून याचे बारीक वाटण करून घ्याचे आहे मिक्सर मधून केले तरी चालते.

वरील साहित्याची पेस्ट होण्याआधी एक वाटी कोमट पाण्यात आपल्याला हरभरे भिजत ठेवायचे आहे रात्री ठेवणे योग्य. त्याच सोबत मध्यम आकारचे बटाटे घेऊन मोठ्या फोडी करायच्या आहेत.

भाजी करण्याची कृती

दोन चमचे तेल आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्याचे आहे. आपण हि भाजी कुकर मध्ये करणार आहोत. तेल गरम झल्यावर अर्धा चमच्या जिरे, दालचिनी, पाच लवंगा, दोन विलयाच्या, तमाल पत्र आणि एक कांदा तो सुद्धा उभा चिरुन घ्या. हे सर्व मसाले चांगले एकत्र करून घ्या त्यनंतर कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्याचे आहे.

कांदा लासर झल्यावर हरभरे जे आपण कोमट पाण्यात भिजत ठेवले होते ते आता स्वच्छ धून घ्याचे आहे. आणि या फोडणीत टाकायचे आहे. बटाटे सुद्धा त्याच वेळेस टाकायचे आहे. ते सुद्धा स्वच्छ धून. थोडे मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्याचे आहे. त्या नंतर आपण सर्वात सुरवातीला जे वाटण तयार केले होते. ते पूर्ण टाकून दयाचे आहे. आणि सर्व एक जीव पर्यंत मिक्स करायचे आहे. हरभऱ्याचा कच्चा पणा कमी होईपर्यंत परतून घ्याचे आहे.

गावरान हरभऱ्याची भाजी जर का या पद्धतीने केल्यास एक भाकरी किंवा पोळी नक्की जास्त खाल्ली जाईल.

योग्य पद्धतीने शिजल्यानंतर एक चमचा लाल मिरची पवडर टाकायची आहे. एक चमच्या मटण मसाला, एक चमच्या गरम मसाला, एकचमच्या घगूती काळे तिखट आणि अर्धा चमच्या हळदी हे सर्वमसाले एकत्र मिक्स करून घ्याचे आहे. आणि सर्व मसाले दोन मिनटं शिजत ठेवायचे आहे. त्यानंतर एक(मोठा ) चमचा हरभरे आणि बटाटे बाहेर काढून घ्याचे आहे. आणि त्याचे वाटण तयार करायचे आहे.

एक ते दीड ग्लास कोमट पाणी टाकायचे आहे. रस्सा जास्त हवाअसेल तर त्या थोडे पाणी वाढवले तरी चालते. आता आपण बाहेर काढलेले हरभरे आणि बटाटे यांचे वाटण करून झल्यावर पुन्हा त्यात टाकून द्याचे आहे. आणि सर्व घटक एकत्र करून घ्याचे आहे. आणि आता चवी नुसार मीठ टाकून घ्याचे आहे. त्यानंतर तीन शिट्या होईपर्यंत कुकरचे झाकण लावून घ्याचे आहे.

हे पण वाचा :- घरात ह्या ४ मातीच्या वस्तू ठेवल्याने होतात शुभमंगल फायदे.

कुकर थोडे थंड होऊद्या आणि आता कुकरचे झाकण काढून घ्या. आपली गावरान हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे. अवश्य हि भाजी तुम्ही करून पहा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट