नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ३१ मार्च गुरुवार आणि ह्या दिवशी आहे दर्श अमावस्या आहे अमावस्याची सुरुवात ३१ मार्च दुपारी १२:२२ मिनीटांनी सुरु होत आहे आणि त्याची समाप्ती हि १ एप्रिल शुक्रवारी सकाळी ११:५३ मिनीटांनी होत आहे. मित्रांनो अमावस्याच्या तिथीला केलेले उपाय हे शिघ्र फलदायी असतात म्हणजेच त्याचे फळ हे आपल्याला तात्काळ प्राप्त होते. ह्या आमवस्याच्या तिथीस सायंकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या समयी जेव्हा सूर्य मावळू लागतो त्या वेळी आपण एक छोटा उपाय नक्की करा.
ह्या उपायाने आपल्या घरातील निर्धनता गरिबी निघून जाईल. आपल्या घरात जर पैसा येत नाहीए किंवा आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाहीए तर आपल्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होऊन वास्तूची भरभराट होऊ लागेल आजच्या ह्या उपायाने. मित्रांनो आपल्या अंगणात तुळशी मातेच्या रोपासमोर आजचा हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हिंदुधर्मात तुळशी मातेला फार मोठे स्थान आहे. आपण तुळशीला देवता मानतो, एवढेच नाही तर ज्या घरात तुळस असते त्या घरावर कोणतेही संकटे येत नाहीत. आणि जरी ती अली तर त्या संकटातून माता तुळस आपल्याला बाहेर काढते.
म्हणून आपण तुळशी मातेची नित्यनियाने पूजा नक्की करावी. विशेष तिथीला आपण तुळशी मातेची विधिवत पूजा देखील आपण करावी कारण तुळस हे प्रेत्येक्ष लक्ष्मी मातेचं रूप आहे. आपण दर्श अमावस्याला सायंकाळी सूर्य मावल्यानंतर आपण एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा आणि तुळशी मातेसमोर हात जोडून आपण ह्या मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त वेळा करायचा आहे.
मंत्राचा जप करण्यापूर्वी आपण अखंड दोन इलायची घ्याची आहेत, ह्या दोन्ही विलायची ह्या साबूत असाव्यात म्हणजेच न तुटलेल्या फुटलेल्या. विलायची हि हिरव्या रंगाची घ्याची आहे. मित्रांनो अश्या २ अखंड विलायची घ्याच्या आहेत आणि त्या आपण आपल्या उजव्या हातात धरून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण माता तुळशीसमोर बोलून दाखवायची आहे. माता तुलशीसमोर आपण तेलाचा अगर तुपाचा दिवा असणार आहे त्यासोबत आपल्या उजव्या हातात दोन विलायची धरून आपण आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण ह्या दोन विलायची आपण तुळशीच्या मातीत आपण गढून टाकायच्या आहेत.
ह्या नंतर आपण ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. मंत्र आहे ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम: ! ह्या मंत्राचा वापर केवळ लक्ष्मी मातेलाच नाही तर वासुदेव म्हणजे नारायण विष्णूंना देखील प्रसन्न करतो. तुळशीला विष्णुप्रिया असे म्हणले जाते. म्हणून आपण ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. तुळशीला आपण प्रदिक्षणा घालायच्या आहेत. आणि जेव्हा आपली जी काही इच्छा पूर्ण होईल घरात जेव्हा लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होईल त्यावेळी आपण ह्या पुरलेल्या विलायची आहेत त्या तिथून काढून आपण त्या वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.
वाहते पाणी नसेल तर कोणत्याही पाण्यात आपण ते विसर्जित करू शकता. मित्रांनो आपण उपाय करत आहेत परंतु कोणतेहि उपाय हे तेव्हाच सफल होतात जेव्हा त्याला परिश्रमाची साथ असते, आपण कष्ट करत राहा त्या कष्टांचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




