धार्मिक

मार्गशीर्ष गुरुवारी फक्त एक दिवा लावून ठेवा इथे, माता लक्ष्मी होइल प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो ह्या पूर्ण ब्रह्मांडाचे पालनकर श्री हरी विष्णू ह्यांचा सर्वात प्रिय महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यात अनेक माता भगिनी महालक्ष्मीचे व्रत करतात. ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात ४ गुरुवार आले आहेत, ९ डिसेंबर, १६,२३ आणि ३० डिसेंबर. ह्या महालक्ष्मी व्रतासोबतच एक दिव्याचा उपाय आपण नक्की करून पहा आपल्या घरात समृद्धी, सुख, धन, संपदा, ऐश्वर्य सर्व काही नांदू लागेल. भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने सर्व काही प्राप्त होईल.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागेल, मग तो कणकेचा घ्या मातीचा किंवा पितळेचा कोणताही एक दिवा आपण घ्याचा आहे. तुपाचा दिवा असेल अतिउत्तम आहे. शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा, आणि जर आपण गाईचे तूप आपलीकडे नसेल तर तुमच्यकडे असलेल्या कोणत्याही तुपाचा आपण वापर करू शकता परंतु त्या तुपात आपण हळद टाकावी जेणेकरून त्याची शुद्धता होऊन येईल.

मित्रांनो हे दीपदान आपण सूर्यास्त झाल्यानंतर आपण तिन्हीसांजेच्या वेळी करायचा आहे. केवळ चार मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे दीपदान केल्यास भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. दोन प्रकारे आपण हे दीपदान करू शकता, पहिली गोष्ट आपण जेव्हा आपण मार्गशीर्ष गुरुवारचे घरातच व्रत करत आहात हे व्रत करतानाच भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर केवळ एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे.

मात्र ह्या दिव्याची वात जी आहे ती आपण कापराच्या साह्याने पेटवायची आहे. कापराला संस्कृत मध्ये कर्पूर असे म्हणतात ह्याच्या मदतीने आपण ह्या दिव्याची वात हे ती प्रज्वलित करायची आहे. केवळ चार गुरवार हे आपण उपाय करायचा आहे. हयामुळे माता लक्ष्मीची कृपा तर आपल्यावरती बरसतेच परंतु भगवंत श्री हरी विष्णू देखील त्याबरोबर प्रसन्न होणार आहेत.

मित्रांनो आपल्या घरासोबतच आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात जिथे कोठे श्री हरी विष्णूंचे मंदिर आहे लक्ष्मीनारायणांचे मंदिर आहे किंवा भगवान श्री कृष्णाचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन देखील आपण हा दिवा प्रज्वलित करू शकता. एक दीपदान आपण हे नक्की करा, प्रज्वलित करण्याची विधी तीच आहे. कोणताही दिवा घ्या व तो कापराच्या साहाय्याने त्याला प्रज्वलित करायचे आहे.

मित्रांनो ज्या प्रकारे कार्तिक महिन्यात दीपदानाचे मोठे माहात्म्य आहे अगदी त्याचप्रकारे दीपदान हे महत्वाचे मानण्यात आले आहे. हे दीपदान झाल्यानंतर आपण भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे कि आपल्या घरात सुख सम्रुद्धी येऊ दे.

मित्रांनो ह्या मार्गशीर्ष महिन्यात आणखी करायचे उपाय आपण घेऊन येणार आहोत पुढील काही लेखात आपल्याला ते वाचायला मिळतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट