प्रत्येक गोष्टीचे एक शास्त्र असते आणि आपण त्या नियमानुसार काही गोष्टी केल्या तर त्याचे नक्की आपल्याला लाभ मिळाल्याशिवाय रहात नाही. काही लोकांना कोणत्या नियमनाचे पालन आपण करायला हवे हे सुद्धा माहीत नसते आणि काही दिवसा नंतर मी देवाची रोज सेवा करतो मी रोज मंदिरात जातो तरी सुद्धा मला कोणताच लाभ मिळत नाही या बदल इतरांजवळ बोलत असतात.
रोज आपण देव पूजा करतो बरेच व्रत करतो तरी सुद्धा म्हणावे तसे कोणतेच लाभ मिळत नसेल तर आपल्या हातून काहींना काही चूक होत आहे हे समजून घ्यावे. घरातून गरिबी न जाणे, घरात नेहमी वाद विवाद होत रहाणे, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरा बाहेर जाणे या सारख्या समस्या सतत चालू असतात. या मागचे खरे कारण आपल्याला लवकर समजत नाही.
आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत. या काही चुका आपण केल्या नाही तर त्याचे लाभ आपल्याला काही दिवसात दिसून येतील. हिंदू शास्त्रातील भविष्य पुराण असे मानतो ज्या मंदिरात आपण दर्शना साठी जातो त्या मंदिराच्या दरवाज्या समोर कधी हि चप्पल सोडू नये. कारण मंदिरा समोर चप्पल सोडल्यावर जे लोक आपली चप्पल ओलंडून जातात त्यांचे दुःख आणि दरिद्रता आपल्या ला येऊ शकते.
त्याच बरोबर आपण घरा मध्ये सुद्धा आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर चप्पल सोडू नये कारण आपल्या मुख्या दरवाज्या समोरून माता लक्ष्मीचे आगमन होत असते. अशा वेळी जर का आपण आपल्या मुख्य दरवाज्या समोर चप्पल बूट सोडले तर लक्ष्मीचे घरात आगमन होणार नाही आलेल्या पावलाने लक्ष्मी पुन्हा वापस निघून जाईल. या करणामुळे मंदिरासमोर आणि घराच्या मुख्य दरवाज्या समोर चप्पल सोडूनये.
बरेच लोक मंदिरात जातात देवाचे दर्शन घेतात. पण काही भक्त असे असतात विनाकारण देवासमोर थंबुन रहातात इतर भक्तांना ताटकळत ठेवतात हे योग्य नाही. तसेच आपण देवाला अभिषक करतो किंवा इतर पूजा करतो त्या वेळेस इतर भक्त ताटकळत उभे रहात असतील तर त्या पूजेचे आणि सेवेचे कोणतेच लाभ आपल्याला मिळत नाही. यामुळे आपल्या देवाची कोणतंही सेवा करताना इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.
तसेच आपण घरात येताना काही गोष्टी एकत्र करून अणूनये दूध आणि दही कधीच एकत्र आणूनये. यामुळे घरात दरिद्रता येऊ शकते. त्याच सोबत कोणाला हि भेट वस्तू म्हणून गणेश मूर्ती भेट म्हणून देऊनये, तसेच आवळ्याच रोपट सुद्धा कोणाला भेट वस्तू म्हणून देऊनये. या काही गोष्टीचे पालन केले तर याचे लाभ आपल्याला भविष्यात नक्की मिळतात. काही गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्या कडे आपण लक्ष देत नाही. या नियमनाचे पालन अवश्य करा फरक नक्की जाणवले.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




