धार्मिक

आपल्या हातून घडणाऱ्या ह्या पाच चुकांमुळे घरात पैसा टिकत नाही.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो, पैसा घरात आल्यानंतर मात्र तो काही टिकत नाही हि बाब खूप लोकंच्या बाबतीत घडून येते. परिणामी असे लोक ज्यांचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते.

आजच्या ह्या लेखात आपण अश्याच काही ५ चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण करतो आणि ह्याच चुकांमुळे आपण गरीब राहतो, ह्या चुकांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाहीत. आपल्या घरात पैसा तर खूप येतो मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो.

अनावश्यक आणि बाश्पळ अश्या वस्तूंवरती आपण खर्च करतो, अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूंमध्ये आपला पैसा खर्च होतो, परिणामी हातात पैसा राहत नाही. चला तर जाणून घेऊयात ह्या पाच चुका कोणत्या. मित्रांनो माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात अश्या पाच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हातानेच घ्यावेत किंवा द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच देईला सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच द्यावेत. कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका. उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात, उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्ययतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरंतर पैसे नीट मोजता यावेत ह्यासाठी अश्या प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून ते पैसे मोजू नयेत. ते तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो, त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्याऐवजी आपण पाण्याचा वापर आपण करू शकता.

हे पण वाचा :-  दुपारी २ वाजता रविवारी गुपचुप जाळा हे. घरात पैसा नक्की येईल.

तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत. महाभारत असेल, रामायण असेल इत्यादी हे सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाने उलटताना आपण थुकींचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते तर असे करू नका, अनेक मार्ग आहेत पाने उलटण्याची म्हणून आपण हे टाळावे हे अशुभ मानले जाते, धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात ३३ कोटी देवांना लावल्यासारखे झाले म्हणून आपण हे कटाक्षाने पाळावे.

चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नखे कापण्याच्या बाबतीत. नखे आपण कोणत्या दिवशी कापावीत ह्याबद्दल माहिती आपण आधीच्या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. तर आपण शक्यतो इतर कोणत्याही दिवशी नखे कापा मात्र रविवारी आपण आपल्या हातापायाची नखे कापा. ज्या घरात रविवारी हातापायांची नखे कापली जातात. त्या घरात सदैव दरिद्रता वास करते, माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाहीत. बरेचजण नखे काढून झाल्यानंतर ती हिकडे तिकडे फरशीवरतीच सांडतात. त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते.

पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे, जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी. ज्यादिवशी हि रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही ह्यातील एकही रुपया आपण खर्च करू नका. दुसऱ्या दिवशी ह्या रकमेतील पैसे खर्च करू शकता. पण तर मित्रांनो ह्या होत्या काही पाच चुका ज्या कि बहुतांश आपल्या कडून होतात. व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही. पैसे घरात टिकत नाही. परिणामी दरिद्रता वास करते.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.