सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे मान्सून यावर्षी अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने अशी माहिती दिली आहे. यावर्षी जवळ पस आठ दिवस आधीच मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात हा मान्सून केरळ मध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. तो सुद्धा नेहमी पेक्षा काही दिवस आधीच.
सर्वाना फक्त मान्सून दखल झाला आहे इतकीच माहिती असते. पण पाऊस एका विशिष्ट दिवसात पाऊस पडला तर त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडला असे बोलले जाते. पण पाऊस पडणे म्हणजे मान्सून दाखल होणे असे होत नाही. मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला कि नाही यासाठी विशिष्ट प्रकारची एक पद्धत आहे. मान्सून सक्रिय झाला कि नाही हे कळू शकते.
शक्यतो पंधरा ते वीस मे दरम्यान अंदमान मध्ये मान्सून दाखल होतो. तर मेच्या शेवटच्या दिवसात केरळ मध्ये मान्सून दखल होतो. पण यंदा जवळ पास आठ दिवशी आधीच मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला आहे. लवकर किंवा उशिरा जर मान्सून दाखल झाला तर त्याचे काय परिनाम होतात याबद्दल थोडक्यात माहिती सुद्धा जाणून घेऊ.
मान्सून दाखल झाला हे कसे समजते. एखाद्या विशिष्ट कालावधीत पाऊस पडत असताना त्या ठिकाणच्या तपमानाचा विचार केला जातो तसेच त्या ठिकाणच्या वाऱ्याचा वेग काय आहे. पावसाचे प्रमाण किती आहे. याचा सुद्धा अंदाज घेतला जातो. यावरून हवामान तज्ञा मान्सून सक्रिय झालाकी नाही याची माहिती देतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हवामान विभागाने अंदमान मध्ये मान्सून आला आहे असे संगितले आहे.
तसे पहिल्या गेल्यास मान्सून येण्याची निश्चित तारीख नसते. बंगाल आणि अरबी समुद्रात होणाऱ्या वातावरणाच्या बदलावर आणि भारतात असलेले तापनमन, वाऱ्याची दिशा, चक्री वादळे यावरून हवामान तज्ञा अभ्यास करून माहिती देतात. यंदा बंगाल मध्ये आलेल्या चक्री वादळा मुळे मान्सून लवकर आला आहे असे तज्ञा सांगत आहेत.
पण बऱ्याच लोकांना असा हि प्रश्न येत असेल जर का मान्सून वेळच्या आधीला किंवा नंतर आला तर पाऊस कमी किंवा जास्त पडतो का? तर तसे बिलकुल नाही. मान्सून लवकर किंवा उशिरा आला तर एका विशिष्ट ठिकाणी पाऊस जास्त कविता कमी पडेल याबद्द काहीही सांगता येत नाही. मोसमी वाऱ्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास करून या वर्षी किती पाऊस पडेल याबद्दल फक्त अंदाज बधला जातो.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




