नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात खास तुमच्यासाठी एक खास सुंदर अशी कथा घेऊन आलेलो आहोत एका जंगलाची, एके दिवशी अचनकपणे जंगलाचे वातावरण बिघडते आकाशात काळे काळे ढग येतात. विजांच्या कडकडाट चालू होतो, वातावरण अगदी भीतीदायक होते आणि अचानक एक वीज जंगलातून पडून जंगलात आग लागते.
सर्व प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी अगदी सैरवैर धावत सुटतात त्या जनावरांमध्ये एक सोनेरी रंगाची केस असलेली हरिणी पळत होती. आणि ती गरोदर होती, अगदी तिची मुलांना जन्म देण्याची वेळ जवळ आलेली होती पण त्या सर्वामध्ये तिच्या पुढे अव्हान होते कि तिला स्वतःचा जीव पहिल्यांदा वाचवायचा होता. आणि नंतर तिच्या पिल्लांना जन्म देणे. हरिणी पळता पळता एका मोठ्या नदीच्या किनाऱ्यावर पोहचली.
आपल्या पिल्लांना जन्म देणे व स्वतःचे प्राण वाचवत आलेल्या हरणीने तिथे आल्यावर थोडा विसावा घेतला तिने नदीचे पाणी पिले. त्यानंतर ती स्वतःसाठी एक अशी जागा शोधू लागली जिथे ती तिझ्या पिल्लांना जन्म देऊ शकेल. अचानक तिला असे जाणवले कि तिझा कोणीतरी पाठलाग करत आहे. तिने तिरक्या नजरेने पहिले तर झाडीत एक शिकारी बंदूक घेऊन लपला होता जो त्याच्या बंदुकेत गोळ्या टाकून त्या हरणीची शिकार करण्यास तयार होता. हरिणीला काय करावे ते सुचत नव्हते. एका बाजूला आग लागलीये आणि दुसऱ्या बाजूला हा शिकारी बसला आहे.
आता त्या हरणीने पूर्ण ताकद लावली व पाळण्यासाठी दिशा बदलली तसा त्या दिशेने तिला वाघ दिसला आता त्या हरणीला सर्व बाजूने संकटांनी घेरले होते. हरणीच्या चारही बाजूला संकट होते, तिझा जीव वाचवण्यासाठी तिला कोणतीही जागा शिल्लक नव्हती. तिने विचार केला कि आता आपण मरणारच आहोत तर का नाही ताठ मानेने मरावे, संकटाचा सामना करून मरुयात मग ती शिकारीकडे तोंड करून उभी राहिली तिने विचार केला कि जर मला जगायचे असेल तर मला ह्या शिकाऱ्यासोबत दोन हात केले पाहिजेत.
तिने देवाकडे प्रार्थना केली कि हे देवा मला शिकाऱ्यासोबत लढण्याची शक्ती दे सर्व तुझ्या हातात आहे. मला ह्या संकटातून सुखरूप वाचव. माझ्या पिल्लांना हे जग पहुंदे, असे बोलून ती शिकाऱ्यावर झडप घालायला जाते. असे म्हणतात कि ह्या जगात चमत्कार असतात. एक ठींगणी उडून शिकाऱ्याच्या डोळ्यात गेली व त्याने बंदुकीतून गोळी हरणीला लागण्याऐवजी ती गोळी वाघाला लागली व तो जागच्या जागी ठार झाला. ठिणगी पडल्यामुळे शिकारी देखील धावत पळून जाऊ लागला तेवढ्यात वातावरण बदलले. आकाशातून पाऊस सुरु झाला, व आग विजू लागली ह्या सुंदर वातावरणात त्या हरणीने आपल्या सुंदर पिलांना जन्म दिला.
मित्रांनो गोष्ट छोटी आहे मात्र खूप मोठी शिकवण देते. आपल्या सर्वांबरोबर अगदी चारही बाजूने संकटे येतात आपल्याला समजत नाही काय करायचे ते अश्या वेळी काय करावे ते समजत नाही तर अश्या वेळी त्या हरणीने जे केलं तेच करायचे ताठ मानेने कोणत्याही संकटांचा सामना करायचा. कारण आपल्या प्रेत्येकात अमर्याद सामर्थ्य आहे. ह्या जगात कितीही मोठे संकट आपल्या मध्ये असलेल्या सामर्थ्यासमोर खूप छोटे आहे. आणि मग काय होईल तर चमत्कार घडेल. ह्यातून एकच शिकवण शेवट्पर्यंत हार मानायची नाही.




