नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचश्या प्राण्यांबद्दल काही शुभ संकेत तर काही अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. गाई, कावळा, साप, कासव, अश्या किती तरी प्राण्यांचा संबंध आपण देवाशी जोडतो आणि ते खरे देखील आहे. प्रेत्येक प्राण्याचा काही अंशी संबंध हा भगवंतांशी जोडला गेला आहे आज आपण मुंगुसाबद्दल जाणून घेणार आहोत. मुंगूस दिसणे या संबधात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मुंगूस दिसणे म्हणजे काय ?
मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो, मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे, ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडले त्या दिवशी आपण समजून घ्यावे कि आपला दिवस हा शुभ जाणार आहे, आपण जे काही काम त्या दिवशी कराल त्यात तुम्हाला यश मिळणारच. मुंगस दृष्टीस पडले कि अगदी एक आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे आपल्याला जरूर मिळतात.
आपण आपल्या घराबाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर ते तर खूपच शुभ असते तसेच मित्रांनो आपल्याला मुंगूस व साप हे भांडताना दिसले तरी ते देखील खूप शुभ मानले जाते. ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्री हरी विष्णूंचा वास असतो म्हणून आजकाल काही घरात मुंगूस पळाले जातात. ते ज्या घरात असते तिथे सापाचे बिलकुल देखील भय राहत नाही. अश्या ह्या मुंगूसाची जोडी दिसणे तर अतिशय फलदायक असते.
मुंगूस दिसल्यावर काय उपाय करावा
आज आपण ह्याच मुंगुसाचा एक उपाय पाहणार आहोत. शकुनशास्त्रात मुंगुसाचे शुभ संकेत व त्यावरील काही उपायांबद्दल माहिती दिली आहे. ज्या प्राणी वनस्पती कडे पाहून आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती शुभ असतात. व ज्या वनस्पती किंवा प्राणी त्यांच्याकडे पाहून आपल्याला भीती वाटते अशे प्राणी किंवा वनस्पती आपल्य्साठी अशुभ असतात असा ढोबळ अर्थ लावला जातो.
प्रेत्येक उपाय करताना त्यात त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीचा काही ना काही तरी सकारात्मक प्रभाव असतोच चला तर पाहुयात कि मुंगुसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय. मित्रांनो जर आपण बाहेर जाईला निघालो आहोत आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी व त्यात आपण घरातील थोडी माती मिसळावी व ती वाटीत ठेवावी व ती वाटी आपण देवघरसमोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावी.
मुंगूस दिसल्यावर हा मंत्र म्हणा
मग जोपर्येंत अगरबत्ती संपत नाही तोपर्येंत ओम नमो नारायणाय ! ह्या मंत्राचा जप करावा. व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे ह्यामुळे आपल्याला खूप सकारत्मक परिणाम दिसतील. आपली अडलेली कामे मार्गी लागतील आपल्या त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे आपण करण्याचा प्रयत्न करत होतो पन ज्यात आपल्याला अपयश येत होते ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल. सर्व नकारत्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारत्मक गोष्टींमध्ये बदलतील.
म्हणजे सर्व बाजूने फक्त सकारत्मक प्रभावच दिसून येईल. मातीची वाटी आपल्याला जोपर्यन्त घरात ठेवायची आहे टोपरेंत ठेवा व त्यानंतर आपण ती घराबाहेर च्या एखाद्या झाडाखाली टाका. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




