navratri mid gharachaya main door
घरगुती उपाय

नवरात्री मध्ये घराच्या मुख्य दरवाज्या वरती गुपचुप लटकवा हि वस्तू आणि करा उपाय. आर्थिक समस्या होतील कमी.

सर्वांच्या घरी नवरात्रीची पूजा चालू असलेलं. माता देवीचे आगमन झाले आहे. त्याची उपासना आणि आराधना चालू असेल. आपण आज असा एक उपाय पाहणार आहोत त्यामुळे आपल्या घरावर वर्ष भर देवीचे कृपा दृष्टी राहते. करणं आपण ज्या पद्धतीने आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो त्या पद्धतीने आपल्याला माता देवीचे स्वागत करायचे आहे. हा छोटासा उपाय पण करून पहा याचे लाभ खुप चागले मिळतात.

आपण घरी नवरात्री सुरु होण्याआधी आपल्या घराची स्वछता केली असेल. आपल्याला या नऊ दिवसात देवी मातेचे स्वागत करायचे आहे. या साठी काही छोटे पण खुप उपयुक्त उपाय आपल्याला करायचे आहे. आपल्या देवी मातेचे या नऊ दिवस स्वागत करायचे आहे. त्या साठी पहिला उपाय असा कि आपला जो मुख्या दरवाजा चौकटीवर दोन्ही बाजूने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. आणि त्या स्वास्तिकाला दोन समांतर रेषा काढायला विसरू नका. जर आपण या रेषा काढले नाहीतर त्या पासून आपल्याला मिळणारे लाभ जास्त मिळत नाही.

बरेच वेळेस दरवाज्यावरती स्वस्तिक काढतात, पण आम्हला कधीच लाभ मिळत नाही. असे बरेच जण बोलत असतात. या मागे हे सुद्धा कारण असू शकते. त्यामुळे स्वास्तिक काढल्या नंतर दोन समांतर रेषा नक्की काढा. स्वास्तिक कशा पद्धतीने काढावे याबद्दल थोडी माहिती घेऊ. अक्षदा मिश्रित स्वस्तिक काढावे यासाठी थोडे अक्षदा मिक्सर मधून काढावे त्यात तोडे हळद टाकून ते चागल्या प्रकारे मिक्स करून त्या पासून स्वस्तिक काढावे.

बऱ्याच वेळेस आपण फक्त स्वस्तिक काढून ठेवतो आपण त्याची पूजा करत नाही. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही. पण कधी पण स्वस्तिक काढल्या नंतर त्याची पूजा नक्की करावी. ज्या वेळेस आपण स्वस्तिकची पूजा करतो त्यावेळेस ते उर्जावान आणि प्रभारित बनते. दुसरी गोष्ट एक ताब्या पाणी भरून आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाजूस ठेवावे. ते सुद्धा बाहेरून आणि त्यात लाल आणि पिवळ्या कलरच्या फुले टाकावी. जर का जमत असेल तर त्यात कमळचे फुल अवश्य ठेवावे. आणि सूर्य मावल्यानंर हे पाणी विसर्जित करावे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी भरून ठेवावे.

तिसरी गोष्ट आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले काढायला विसरू नका. हि पावले आल्या घरात जाणारी असली पाहिजे आणि त्यात कुंकू भरायला विसरू नका. हि गोष्ट नक्की लक्षात ठेवा. घराच्या बाहेर जाणारी पावले कधी हि काढूनये. या तिन्ही गोष्टी तुम्ही करून पहा याची प्रचिती नक्की येईल. वर्ष भर तुम्हला कोणताही त्रास होणार नाही याची नक्की काळजी देवी माता घेईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट