धार्मिक

नवरात्रीच्या दिवसात गुपचूप दिव्यात टाका हि एक गोष्ट, सर्व समस्या होतील दूर वर्षभर पैसा कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो ७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे. अनेक घरात घटस्थापना देखील झाली आहे. आणि घाटापुढे दिवा देखील आपण लावतो. ह्याच दिव्यासमोर आपण न चुकता दररोज एक वस्तू नक्की टाकत चला तुम्हाला देवीच्या कृपेने पैसा कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो हा उपाय आपण सकाळी किंवा संध्यकाळी आपण केव्हा हि करू शकता, मात्र हा उपाय करताना काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नका. लाल, पिवळा, हिरवा हे अत्यंत शुभ रंग आहेत जर आपल्याकडे ह्या रंगांपैकी कोणती वस्त्रे असतील तर हि वस्त्रे परिधान करून आपण उपाय केल्यास त्याचे फळ चांगले मिळते.

उपाय कसा करायचा आहे ह्यासाठी जो अखंड दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्याच्या बाजूला लावलेला आहे त्या दिव्यात आपण हा उपाय न करता आपण वेगळा स्वतंत्र दिवा घेऊन त्यात हा उपाय करा.

आपण दिवा कोणत्याही प्रकारचा दिवा मग तो धातूचा, मातीचा किंवा कणकेचा दिवा असूद्यात आणि जर तुम्ही जर कणकेचा दिवा करणार असाल तर त्यात आपण चुकूनही मीठ घालू नका. हा दिवा आपण थेट जमिनीवर सुद्धा ठेवायचा नाहीए आपण तो दिवा एखाद्या प्लेट मध्ये ठेवायचा आहे जेणेकरून त्याला आसन मिळेल. आसनाशिवाय थेट जमिनीवर ठेवलेला दिवा अपूर्ण मानला जातो आणि त्याचे फळ मग आपल्याला मिळत नाही.

आपण दिवा अहा तेलाचा किंवा तूपाचा कोणताही दिवा वापरू शकता. आपण आपल्या देवघरातील घरासमोर हा दिवा लावायचा आहे देवीला कुंकू लावायचा आहे. देवीला प्रणाम करायचे आहे आणि त्यानंतर एक साबूत लवंग म्हणजेच न फुटलेली तुटलेली लवंग जिला समोर फुल आहे ती आपण मातेसमोर ठेवून आपली जी काही इच्छा आहे समस्या आहे ती आपण बोलून दाखवायची आहे पैस्यांची प्राप्ती होत नाहीए हि मनोकामना आपण बोलून दाखवायची आहे आणि जी लवंग मातेच्या चरणासमोर ठेवली आहे ती आपण तिथून उचलून आपण दिव्यात टाकायची आहे.

नंतर आपण एक मंत्र बोलायचा आहे, मंत्र असा आहे कि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ह्या मंत्राचा आपण १०८ वेळा उच्चारण करायचे आहे व नंतर आपण देवीची आरती करायची आहे. आरती सुद्धा त्याच दिव्याने ओवाळायची आहे ज्या दिव्यात आपण लवंग टाकली होती.

दिवा विजल्यानंतर आपण जी काही लवंग शिल्लक असेल तर त्यावर आपण कापराच्या दोन वड्या टाकून हि जाळून टाकायची आहे. व जी राख होईल ती राख आपण एका पात्रात पाणी घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात ती टाकायची आहे. आणि हे राखयुक्त जल आपण कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी टाकायचे आहे.

मित्रांनो हा उपाय आपण नवरात्रीच्या राहिलेल्या प्रेत्येक दिवशी केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या त्या लवंगेप्रमाणे जळून दूर होतील. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट