या सात मूर्ती देवघरात कधीही ठेऊ नका. नाहीतर मोठे नुकसान होईल.
वास्तू शास्त्र

या सात मूर्ती देवघरात कधीही ठेऊ नका. नाहीतर मोठे नुकसान होईल.

बरेच लोक सतत विचार असतात कि देवघरात कोणत्या देवाच्या मूर्ती ठेवाव्या किंवा ठेऊ नय. काही अशा मूर्ती असतात ज्या जर का आपण देवघरात ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याव होत असतो. त्याचसोबत काही देवांच्या मूर्ती या विशिष्ट पद्धतीने ठेवायच्या नसतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होत असतो.

या सात देवाच्या मूर्ती जर का आपल्या देवघरात असतील तर आपण देवांची केलेली पूजाचा लाभ आपल्याला योग्यरित्या मिळत नाही. त्यामुळे आपल्या घरात सतत काहींना काही समस्या येत राहतात. काही लोकांना आर्थिक गोष्टींचा त्रास होत जातो. काही घरात सतत एक मेकांशी लोक वादविवाद होत असतात. त्याच सोबत आपल्या घरात बऱ्याच प्रमाणत नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त होत जातो.

आपल्या घरातील सर्वात जास्त सकारात्मक गोष्टीचा प्रभाव हा देव देवघरापासून मिळतो. आपले देवघर शक्यतो ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास खुप चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यामधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा किंवा आपण त्याला आपण ईशान्य कोपरा सुद्धा बोलतो. वास्तुशास्त्रा नुसार हि दिशा खुप चांगली मानली जाते. यामुळे जो व्यक्ती देवाची पूजा करतो त्याचे तोंड हे एकतर पूर्वेकडे किंवा उत्तर दिशा कडे असेल. आणि या दोन्ही दिशा चांगल्या मानल्या जातात.

आपण देवाची रोज पूजा करतो त्याच सोबत आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करत असतो त्यामळे आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होत जातो. मग अशा कोणत्या मूर्ती आहेत ज्या आपण आपल्या देवघरात ठेऊ नये. ज्या मुळे आपल्याला त्याचा काही प्रमाणत त्रास होत जातो. जाणून घेऊयात कोणत्या देवाच्या मूर्ती देवघरात ठेऊ नये.

पहिली मूर्ती आहे नटराज. जी मूर्ती तांडव नुर्त्य करते जी शिवशंकराचा एक रूप आहे. हि मूर्ती जर का आपण आपल्या देवघरात ठेवली तर आपल्या घरात सतत वादविवाद होत जातात. घरात अशान्ति होत जाते. घरातील लोकांची एकमेकांवर नाराजगी वाढत जाते. यामुळे हि मूर्ती देवघरात शक्यतो ठेऊ नका.

दुसरी मूर्ती आहे महाकालीची. महाकाली हि एक देवीचे रूप आहे. राक्षसाचे वध करण्यासाठी दुर्गा देवीने महाकालीचे रूप धारण केले होते. रागीट स्वरूपाची महकलीची मूर्ती आपण आपल्या देवघरात कधीही स्थापित करुनये. क्रोधीत असलेली कोणतीही मूर्ती शक्यतो आपल्या देघरात कधीही ठेऊनये. यामुळे घरातील लोकांचे स्वभाव सुद्धा रागीट स्वरूपाचे होत जाते.

शनी देवाची मूर्ती आपल्या देवघरात कधी हि ठेऊ नका. कारण त्यांची दृष्टी ज्यांच्या वर पडते त्यांचा विनाश नक्की होते. त्यामुळे शक्यतो शनी देवाची मूर्ती कधीही देवघरात ठेऊ नका. चौथी मूर्ती आहे भैरवनाथ यांची. भैरवनाथ हे महादेवाचा अवतार आहेत. त्याच सोबत ते तंत्र आणि मंत्र यांचे स्वामी आहेत. भैरवनाथ यांची पूजा करण्याचे काही कडक नियम ठरवून दिले आहेत. हे नियम आपल्या कडून पळणे शक्य होत असेल तर त्यांची पूजा करत जावी.

पाचवी मूर्ती म्हणजे माता लक्ष्मीची. लक्ष्मीची मूर्ती घरात ठेवणे सर्वात चांगले मानले जाते. पण माता लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती देवघरात ठेऊनये. ज्या घरात उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. घरात मुबलक प्रमाणात पैसा येतो पण त्याच सोबत इतर खर्च सुद्धा लगेच येतात.

शेवटची मूर्ती आहे राहू आणि केतू यांची स्वत्रं मूर्ती सुद्धा देवघरात ठेऊ नका यामुळे सुद्धा घरात बऱ्याच प्रमाणात त्रास होतो. या मूर्ती जर का तुमच्या देवघरात असतील तर नक्की त्या विसर्जित करा. आपल्या देघरात असलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा जवळच्या मंदिरात ठेऊया.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट