प्रत्येक व्यक्तीला कोणतीही मोठी वस्तू घ्याची असेल तर त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. पण आपण काही नियम पाळले तर आपल्याला कमीत कमी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्ज घेणे चुकीचे नसले तरी ते आपण टळू शकतो. काही गोष्टींचे पालन आपल्या करावे लागणार आहे. जर का आपण काही नियमांचे पालन केले तर नक्की आपल्याला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
असे कोणते नियम आहे ज्याचे आपल्याला पालन करायचे आहे. त्या बदल जाणून घेऊ. पहिला नियम नियमित पैसा सेविंग करणे म्हणजे बचत करून ठेवणे. जर का पण नियमित बचत केल्यास आपल्याला कर्ज घेण्याची गरज लागणार नाही. कारण आपण कर्ज कधी घेतो ज्या वेळेस आपल्या कडे पैसे नसतात त्याच वेळेस आपण कर्ज घेतो. जर का आपण नियमित पैसे बचत करून ठेवले तर त्याचा लाभ आपल्या नक्की कधीना कधी होत जातो.
पैसे सेविंग करण्याचे काही मार्ग आपण तयार करून ठेवावे जेणेकरून आपल्या बचतीची सवय लागेल. जसे कि आपली पगार झली कि काही रक्कम हि आपण दुसऱ्या बँक खात्यात जमा करत जावी, किंवा पोस्टात आणि बँकेत RD काढावीत जेणेकरून दर महिन्याला आपण त्यात पैसे भरू शकतो. असे काही नियम करून आपल्याला पैसे बचतीची सवय लागून घेऊ शकतो
दुसरा नियम आपत्कालीन निधी तयार करा (emergency fund). आपल्या रोजच्या जीवनात कधी कोणती हि आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. जसेकी वैद्यकीय आणीबाणी (medical emergency), व्यवसायात अचानक पैसा लागणे, नोकरी जाणे. अशा वेळेस आपल्या जवळ मुबलक प्रमाणत पैसा असणे गरजेचे असते. नाहीतर आपल्याला दुसऱ्याकडून उधार घेण्याची किंवा कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे आपण जर का नियमीत बचत करत राहिलो तर आपल्याला आपत्कालीन परिस्थिती घाबरण्याची गरज पडणार नाही.
तिसऱ्या नियम अंदाजपत्रक तयार करणे (Preparation of budget). म्हणजे काय तर आपला महिन्यला अंदाजे किती खर्च आहे. याची यादी तयार करणे. ज्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत त्याच आधी पूर्ण करणे आणि अशा गोष्टी बाजूला ठेवणे ज्या मुळे आपल्या वर कोणत्याच परिणाम होत नाही. जसेकी चैनींच्या गोष्टी नेहमी बाहेर जेवायला जाणे यावर नियंत्रण ठेवणे. कमीत कमी दोन हजार पाचशे म्हणजेच अडीच हजार महिण्याला बचत झाली पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवायचे आणि इतर खर्च करण्याचा. उदाहरण जर का आपला पगार हा २५००० असेल तर २५०० – २५०० = २२५००(रुपय) पर्यंत आपण खर्च करू शकतो.
चौथी गोष्ट आर्थिक नियोजन. आपण ज्या वेळेस खर्च करत असतो. त्याचे नियोजन असणे गरजेचे असते. जर का आपल्याला भविष्यात पैसे येतील म्हणून कर्ज घेऊन खर्च केले तर आपण कर्जाच्या चक्रात अडकून जातोल. भविष्यात आपल्याला किती पैसा लागू शकतो तसेच भविष्यात किती व कोणत्या मार्गे पैसा येणार आहे याचे नियोजन करत जा.
पाचवी गोष्ट आर्थिक जागृता. बऱ्याच वेळेस असे होते कि आपल्याला एखादी मोठी वस्तू घेण्यासठी कर्ज घ्यावेच लागते आपण कितीही बचत केली तरी. अशा वेळेस स्वतःला एक प्रश्न विचार या वस्तूची किती गरज आहे आपल्याला. जर हि वस्तू गरज नसून फक्त इच्छा आहे म्हणून घ्याचिका असेल तर घेऊ नका . ज्या गोष्टीची खुप गरज आहे. अशाच वस्तूला जास्त प्राधान्य द्या.
या पाच नियमांचे पालन केल्यास भविष्यात आपल्यला जास्त कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. तसेच एखादी आपत्कालीन गोष्टी साठी पैसा लागणार असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हला त्रास होणार नाही. एक गोष्ट लक्षात असुद्या बचत हि थोडी फार का होईना करत जा यामुळे भिष्यात त्रास होणार नाही.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




