धार्मिक

विजयादशमी (दसरा) इथे ठेवा एक आपट्याचे पान, सर्व आर्थिक अडचणी दूर होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. १५ ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी आहे दसरा त्यालाच विजयदशमी असे देखील संभोधले जाते. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. आणि ह्या दसऱ्याच्या रात्री काही उपाय केले जातात. ह्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावशाली असतात.

ह्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात कारण त्याचे विशेष असे एक वैशिष्ट्य असते. आपट्याच्या पानात ईश्वरी शक्ती शोषून घेण्याची ताकद असते. ह्या आपट्याच्या पानात शिवतत्त्व तसेच श्री राम तत्व देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणून हि आपट्याची पाने आपण ह्या दिवशी देवघरात अवश्य ठेवावी.

तर ह्या आपट्याच्या पानांचाच एक उपाय आपण जाणून घेणार आहोत. हा एकच उपाय तुम्हाला वर्षभर पैस्यांची तंगी जाणून देणार नाही. पैसा कधीच कमी पडणार नाहीत. मित्रांनो जी आपट्याची पाने आहेत त्या आपट्याच्या पानांची एकप्रचलित कथा आहे.

प्राचीन काळात एक वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले मित्रांनो हि कथा का माहिती असावी कारण जेव्हा आपण एखादा उपाय आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करतो तेव्हाच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते म्हणून आपण आजच्या लेखात ह्या कथेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात, जेणेकरून आपल्या मनात ह्या उपायांबद्दल कोणताही पंतु किंतु राहणार नाही.

मित्रांनो वरतंतू नावाच्या ऋषींकडे अनेक लोक विद्या मिळवण्यासाठी येत असत. त्यापैकीच एक शिष्य होता त्याचे नाव होते कौस्त आणि त्याने १४ हुन जास्त विद्या हसत केल्या तेव्हा त्याने गुरुदक्षिणा म्हणून ऋषींना काय देऊ असे विचारले तेव्हा ऋषी म्हणाले तुझा जर आग्रह असेल तर तू एका विद्येसाठी एक कोटी सुवर्णमुद्रा अश्या प्रकारे १४ विद्या मिळवल्याबद्दल तू १४ कोटी सुवर्णमुद्रा तू दे.

कौत्साने खूप मेहनत घेतली होती त्या विद्या मिळवण्याचा आणि म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी ऋषींनी अश्या प्रकारे मागणी केली. कौत्साने खूप प्रयत्न केला ते मिळवण्याचा तो शेवटी आपल्या राजाकडे गेला राजाला त्याने सर्व हकीकत सांगितली राजा देखील नुकताच विश्वजित यज्ञ पार पाडला होता, आणि त्या कारणास्तव राजाकडे देखील तितक्या मुद्रा शक्य नव्हत्या.

म्हणून त्या राजाने ३ दिवसाची मुदत मागितली आणि त्याने थेट इंद्रलोकावर स्वारी करायची ठरवले. हि गोष्ट इंद्राला समजताच इंद्र भयभीत झाले व ते ताबड्तोक कुबेराकडे गेले. आणि मग ह्या कुबेराने रघु राजाच्या राजवाड्यावर प्रचंड प्रमाणात सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला ह्या मुद्रा ह्या आपट्याच्या पानांच्या स्वरूपात होत्या.

कौत्साने कोणताही लोभ ना बाळगता त्यातील केवळ जेवढ्या लागणार होत्या तेव्हढ्या मुद्रा ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या उरलेल्या मुद्रा आता काय करायचे म्हणून राजाला प्रश्न पडला म्हणून राजाने ह्या मुद्रा सामान्य प्रजेला ह्या सुवर्णमुद्रा लुटून नेण्यास सांगितले आई हा दिवस होता विजयादशमी दसऱ्याचा. तेव्हापासूनच आपट्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली. आपट्याची पानांना सोन्याचे महत्वव आले.

मित्रांनो अशी हि आपट्याची पाने ज्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते. आणि अशी ह्यातील दोन पाने आपण आपल्या तिजोरीत किंवा तुम्ही जिथे तुमचे पैसे अडका दागदागिने ठेवता अश्या ठिकाणी हि पाने आपण ठेवावीत अशी हि पाने आपण वर्षभर जपून ठेवा. लक्षात घ्या हि पाने आपण माता लक्ष्मीच्या चरणी वाहलेली आहेत म्हणून आपण ती तिजोरीत ठेवताना ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम: ह्या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा उच्चार करत ती पाने आपण ठेवायची आहेत.

जेणेकरून आपण आपल्या उपाय करतो आहे तो प्रभावशाली ठरेल. तर असा छोटासा उपाय आपण विजयादशमीच्या रात्री अवश्य करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. ओम नमो नारायणा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट