लाईफस्टाईल

आठवड्यातील प्रेत्येक वारी घाला ह्या कलरचे कपडे, आपले सर्व कामे अगदी विनाअडचणी पार पडतील

जय जय स्वामी समर्थ, मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनावर नवग्रहांचा प्रचंड प्रभाव पडतो. आठवड्यातील प्रेत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडित आहे. तसेच प्रेत्येक ग्रहाशी निगडित रंग देखील आहे. मग त्या त्या वारी त्या ग्रहाशी निगडित आपण वस्त्र जर परिधान केले तर नक्कीच आपल्या नशिबाची आपल्याला चांगली साथ मिळते.

त्याचबरोबर आपल्या कार्यात आपल्याला यश देखील मिळते. रंगाचे देखील स्वतःचे असे विज्ञान आहे. कोणत्या दिवशी कोणते रंगाचे कपडे घालायचे आहेत व कोणत्या दिवशी कोणते रंग टाळायचे आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात सांगणार आहोत. मित्रांनो आपण दररोज निटनिटके कपडे परिधान करून घराच्या बाहेर कामासाठी जातो. आणि हे कपडे घालायच्या आधी, सध्याचा ट्रेंड काय आहे, कशावर काय मॅचिंग होते ह्याची काळजी घेतो.

हे जरी आपण चांगले दिसण्यासाठी करत असलो तरीही कपड्याच्या रंगाचा आपल्या आयुष्यात खूप घट्ट संबंध असतो. आपल्या मनावर वेगवेगळ्या रंगाचा खूप खोलवर परिणाम होत असतो. काही रंग थंडावा देतात तर काही रंग ऊर्जा वाढवतात. त्याचबरोबर काही रंग मनाला जाड करतात तर काही रंग मनाला प्रसन्न करवतात, तर काही मनाला उदासी देखील देतात.

सोमवार: हा शिवशंकरांचा वार आहे, तसेच सोमवार हा चंद्राचा देखील वार आहे म्हणून सोमवारी आपण पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, ह्या दिवशी काळे किंवा चमकदार किंवा लाल रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नयेत, त्याचबरोबर फिकट रंग वापरावेत.

मंगळवार: हा दिवस हा मारुतीरायांचा दिवस मानला जातो. आणि हा दिवस मंगळ ग्रहाशी निगडित आहे, म्हणूनच आपण लाल कपडे घालावीत. तसेच गुलाबी किंवा लाल रंगाची कोणतीही शेड आपण निवडू शकता. लाल रंग सोडून तुम्ही दुसरी शेड ती म्हणजे क्रीम कलर किंवा फिक्कट पिवळा रंग देखील वापरू शकता. पंरतु लक्षात घ्या कि ह्या दिवशी आपण चमकदार हिरवे कपडे घालू नका.

हे पण वाचा :-  जर मुंग्याची लाइन घरात दिसली, तर समजून घ्या होईल काही असे.

बुधवार: हा दिवस गणपती बाप्पांचा दिवस, आणि त्यांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत म्हूणन आपण ह्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालायला हवेत. सकाळी तुम्ही जॉगींग ला गेला किंवा खेळायला गेला तर तुम्ही हिरवा ट्रॅक सूट घालून जाऊ शकता, काही जण ऑफिस मध्ये पिस्ता कलरचे कपडे वापरतात, तर ह्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची शेड वापरू शकता तसेच त्याला कॉम्बिनेशन मध्ये राखाडी किंवा काळा रंग वापरू शकता.

गुरुवार: हा दिवस हा श्री हरी विष्णू, साईबाबा, स्वामी समर्थांचा वार आहे. ह्या दिवशी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. पिवळा रंग हा तिन्ही देवांना प्रिय आहे. तुम्ही लाइट शेड्स देखील वापरू शकता जसे कि क्रीम, गुलाबी ह्यांच्या कॉम्बिणेशन मध्ये आपण पिवळा रंग वापरू शकता. ह्या दिवशी आपण पारंपरिक कपडे घालण्यास प्राधान्य द्या.

शुक्रवार: हा दिवस हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि ह्या दिवशी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण गुलाबी रंग परिधान करावा, तसेच पाठीवरती कपडे घालावेत. काही चमकणारे कपडे देखील तुम्ही घालू शकतात, राखाडी, निळा असे रंग आपण त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये वापरू शकता. ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावेत.

शनिवार: हा दिवस शनी देवाचा वार आहे, म्हणून ह्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करावेत. ह्या दिवशी आपण निळा राखाडी हिरवा रंग देखील परिधान करू शकता. चौकोनी आणि पाट्याचे कपडे देखील परिधान करू शकतात. ह्या दिवशी आपण लाल रंग मात्र अजिबात परिधान करू नये आणि काळा आणि लाल रंग असे देखील कॉम्बिनेशन घालू नये.

रविवार: हा सूर्य देवाचा वार आहे, ह्या दिवशी आपण केशरी, सोनेरी रंगाचे कपडे परिधान करू शकता, तसेच तुम्ही ह्यासोबत गुलाबी रंग देखील वापरू शकता.

शुक्रवारी नवीन कपडे घालणे शुभ असते ह्याशिवाय, बुधवारी गुरुवारी तुम्ही नवीन कपडे घालू शकता. मंगळवारी आणि रविवारी तुम्ही नवीन कपडे खरेदी तसेच परिधान देखील करू नयेत. तर मित्रांनो वारानुसार कपडे घातल्याने काय होते ह्याबद्दल अनुभव तुम्ही कपडे घालून पहा व तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.

हे पण वाचा :-  दिवाळीच्या दिवसात ह्या ५ संकेतांपैकी एक संकेत मिळाला तर, समजून जा लक्ष्मी घरात आली आहे.

टीप: वर दिलेली माहिती ज्योतिष व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.