धार्मिक

बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात ठेवा हि एक गोष्ट, गरिबी कायमची होईल दूर.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी वस्तू आपल्या किचन मध्ये ठेवावी हा उपाय घरातील महिलांनी करावा आणि जर महिला नसतील तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल. बुधवारी केलेला हा छोटासा उपाय कुंडलीतील बुध ग्रहास मजबूत बनवतो व त्यामुळे आपली वाणी प्रभावशाली बनते आपली बुद्धी तीव्र बनते. नोकरी असो उद्योगधंदा व्यापारातून पैस्याची आवक वाढते, पैसा घरात मोठ्या प्रमाणात येऊ लागतो.

घरात जर तुमच्या कोणी लहान शिकत असेल तर त्यांच्या अभ्यासात देखील प्रगती घडून येईल. मित्रांनो बुधवारी हा उपाय आपण कराच परंतु सोबत आपण आजच्या दिवसात आपण गाईला हिरवा चारा नक्की खाऊ घाला. गोरगरिबांना ह्या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे, तसेच महिलांनी ह्या दिवशी हिरवा रंग परिधान करावा. आणि हिरव्या रंगाचे जर आपल्याला घालणे त्या दिवशी शक्य नसेल तर ह्या दिवशी आपण एक हिरव्या रंगाचा रुमाल तरी सोबत ठेवावा.

मित्रांनो हे छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात बरेच बदल घडवून आणतात. तर आपण ह्या दिवशी उपाय करणार आहोत तो जाणून घेऊयात. आपल्याला ह्या दिवशी एक कागद घ्याचा आहे सफेद कागद घेऊन त्यावर आपण हिरव्या रंगाच्या पेनाने त्यावर आपल्या कोणत्याही देवीदेवतेचे नाव त्यावर लिहायचे आहे. त्यानंतर आपण त्या कागदावर थोडेसे धने घ्याचे आहेत परंतु हे धने आपण पावडर स्वरूपात घ्याचे आहेत. तर अशी ५ चिमूटभर धान्याची पावडर आपण त्या कागदावर ठेवायची आहे आणि हि ठेवताना आपण ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नम:। ह्या मंत्राचा जप करा.

प्रत्येक चिमूट टाकताना आपण हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर आपण ५ हा अंक त्या सफेद कागदावर हिरव्या रंगाच्या पेनाने त्यावर लिहायचा आहे. थोडासा मोठा लिहावा. मित्रांनो ५ हा अंक बुध ग्रहाशी थेट संबंधित आहे. त्यानंतर आपण त्या कागदाची घडी घालायची आहे. आणि आपल्या किचमधील उत्तरेकडील कोणत्याही बाजूस आपण हि पुडी ठेवायची आहे. उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे. म्हणून आपण हि पुडी आपण उत्तर दिशेला ठेवायची आहे.

ह्या दिशेने आपली मोठ्या प्रमाणात आवक वाढू शकते. उद्योगधंदा तेजीत चालायचा असेल तर हि उत्तर दिशा सांभाळणे खूप महत्वाचे असते. मित्रांनो हा उपाय आपण बुधवारी रात्री करावा आणि हो विश्वासाने हा उपाय करावा कारण विश्वास असेल तरच तो उपाय सिद्धीस येतो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट