नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आज आपण एक खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपली कर्जे फिटतील, तसेच ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, घरात पैस्याची चणचण भासते अश्या सर्वांवर उपाय तोटका आज आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत. बऱ्याच जणांच्या घरात पैस्यांची चणचण असते कोणी पैसे घेतले असतील तर ते परतच करत नाही किंवा २४ तास काबाडकष्ट करून देखील त्याचा त्याला म्हणावा असा मोबदला मिळत नसेल तर अश्या व्यक्तींसाठी आजचा हा रामबाण उपाय आहे.
मित्रांनो उपाय करून पहा करून पाहायला काहीच जात नाही मित्रांनो बऱ्याच वेळा तोटका हा शब्द म्हण्टले कि लोकांना भीती वाटते पण कोणतीही गोष्ट करताना, कोणतेही काम करताना ते विश्वासाने केले जर आपण आपल्या मनात पोस्टीव्हिटी ठेवून सकारात्मक विचारदृष्टीने एखादे कार्य केले तर ते कार्य यशस्वी रित्या पूर्ण होते. म्हणूनच कोणताही तोटका तुम्हाला सांगितला गेला तर तो अगदी तुम्ही विश्वासाने करायला हवा तरच तुम्ही त्या समस्यांतून बाहेर पडणार. नाहीतर तर तो उपाय फायदा करून देत नाही.
आजचा उपाय अगदी साधा सोपा आहे जो केल्याने आपल्या सर्व काही आर्थिक समस्या असतील त्या सर्व समस्या आहेत त्या सर्व दूर होतील. आजच्या उपायासाठी ३ गोष्टी उपयुक्त आहेत त्यातील एक म्हणजे कापराची वडी, एक लिंबू, एक हळकुंड ह्या तीन साहित्याची आवश्यकता आहे. तुम्ही वर्षातील कोणत्याही एका दिवशी हा उपाय करू शकता ह्याला वेळेचे देखील काही बंधन नाही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही हा उपाय आपण करू शकता.
तर उपाय करताना एक कापराची जी वडी घेतली आहे त्याची आपण पावडर करायची आहे आणि हि पावडर आपण आपल्या तळहातावर घ्याची आहे जिथे आपली धनरेषा आहे तिथे घ्याचि आहे आणि त्या पावडर मध्ये आपण लिंबाचे काही थेंब टाकायचे आहेत. लिंबाचे थेंब टाकल्यानंतर त्यात एक हळकुंड घ्याचे आहे आणि त्या लिंबू आणि कापराच्या मिश्रणावर फक्त १० मिनटे फिरवायचे आहे.
एका हातावर फिरवून झाल्यानंतर अगदी सेम आपण दुसऱ्या हातावरती देखील करायचे आहे, आणि आपण दोन्ही हाताच्या धनरेषेवर आपण हे हळकुंड फिरवायचे आहे. अश्या पद्धतीने आपण हा उपाय करायचा आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




