धार्मिक

१७ जानेवारी पौष पौर्णिमा गाईला खायला घाला हि एक वस्तू, सर्व अडचणी होतील दूर

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो उद्या आहे पौष पौर्णिमा ह्या पौर्णिमेस शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतात कारण ह्याच दिवशी शाकंभरी देवी नवरात्रांची सांगता होते. ह्या वर्षी आलेली पौष पौर्णिमा अत्यंत शुभ संयोगात आहे म्हणूनच सर्वकार्य सिद्धीसाठी व अनंत सुखांच्या प्राप्तीसाठी आपण ह्या पौष पोर्णिमेत गोमातेला म्हणजेच गाईला आपण हि एक वस्तू नक्की खायला घाला जेणेकरून आपल्या प्रेत्येक कार्यात यश प्राप्त होईल व घरात सुख शांती व समृद्धी निर्माण होईल.

हिंदू धर्म शास्त्र असे मानते कि हे व्रत करणाऱ्यास ह्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करणाऱ्यास त्यांच्या मनातील इच्छांची पूर्तता भगवान श्री हरी विष्णू नक्की प्राप्त करून देतात. ज्यांची महादेवांवर श्रद्धा आहे, ह्यावर्षीची पौर्णिमा सोमवारी आल्याने अश्या शिवभक्तांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवशकंराची पूजा नक्की करावी. हा महाउपाय आपण कसा करायचा ते पाहुयात.

ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून आपण नित्यनियमाप्रमाणे देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर सायंकाळी म्हणजेच सूर्यास्तावेळी आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे.

भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेत आपण पिवळ्या रंगाची फुले, फळे, पिवळ्या रंगाची मिठाई असे सर्व काही आपण अर्पण करायचे आहे. एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे व आपण आठ केळी व आठ गुळाचे खडे आपण नैवैद्य स्वरूपात अर्पण करायचे आहेत.

भगवान विष्णूंकडे आपण प्रार्थना करायची आहे कि आपल्या कामातील सर्व बाधा अडचणी सर्व काही दूर होउदे. अनेकदा आपल्या जीवनात असे होते कि काही कामे होता होता थांबतात, काम होणारच असते परंतु त्यात काही तरी विग्न येते तर असे विघ्न बाधा दूर होण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या महमंत्राचा जप अप्पन १०८ वेळा करायचा आहे व त्यानंतर आपण हात जोडून आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा व त्यानंतर आपण ह्या आठ केळी व आठ गुळांचे खाड्यांपैकी आपण चार प्रेत्येकी आपण घेऊन आपण आपल्या घराच्या जवळपास असलेल्या गाईला. हा प्रसाद म्हणजेच चार केळी व चार गुळाचे खडे आपण खाऊ घालायचे आहे.

आपण हे खाऊ घालण्यापूर्वी आपण गाईच्या मस्तकी हळदीने टिळक करायचे आहे. आरती ओवाळायची आहे तिला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. व नंतर आपण हि केळी व गुळाचे खडे आपण आपल्या उजव्या हाताने खाऊ घालायचे आहेत. शक्य असेल तर गौ मातेच्या पाठीवरून वात्सल्याने हात देखील फिरवा. त्यानंतर आपण गोमातेच्या चार प्रदिक्षणा घालायच्या आहेत. तुम्हाला माहिती असेल कि गाईमध्ये ३३ कोटी देवीदेवता वास करतात.

आजचा आपला उपाय हा सर्व देवीदेवतांना प्रसन्न करणारा आहे. ३३ कोटी म्हणजे कोटीचा अर्थ प्रकार असा होतो. मित्रांनो जर तुमच्या घरी कोणी आजारी असेल आणि तिच्या वतीने हा उपाय कोणी केला तरी चालेल. आपली इच्छा आहे ती आपण प्रदिक्षणा घातल्यानंतर बोलून दाखवायची आहे व नंतर आपण घरी यायचे आहे. मित्रांनो आपण हाय दिवशी सत्यनारायण कथेचे श्रवण नक्की करा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट