नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो एकूण १२ राशी आहेत आणि ह्या सर्व राशींचे स्वभाव देखील वेगवेगळे आहेत. ह्या राशींची वर्गवारी हि जल तत्व, अग्नितत्त्व, वायुतत्व इत्यादींवर करण्यात आलेली आहे. त्याचा सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वभावावर बराच परिणाम होतो. एखादी व्यक्ती खूप रागीट असते तर एखादी व्यक्ती खूप शांत व प्रेमळ स्वभावाचे असतात.
खूप वेळा आपण पाहतो कि एकाच घरातील अगदी दोन सख्खे भाऊ मात्र त्यांचा स्वभाव अगदी वेगवेगळा असतो. ह्या सर्वाला त्यांची रास कारणीभूत ठरते. एखादा अगदीच तापट चिडचिडा स्वभावाचा तर एखादा अगदी शांत स्वभावाचा असतो. मग ह्यावर लोकांच्या राशीचा प्रभाव असतो. परंतु सर्वच राशी काही तापट स्वभावाच्या नसतात काही राशी अगदी प्रेमळ शांत समजूतदार स्वभावाच्या देखील असतात.
आजच्या लेखात आपण भावनीक राशी कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात भावनिक असणारी सर्व राशींमध्ये रस ती म्हणजे कर्करास. समानअर्थी शब्द आहेत भावुकता व कर्करास असे म्हण्टले तरी अतिशोक्ती होणार नाही इतकी हि रास भावनिक असते. प्रचंड कुतूहल, व्यावसायिक कार्यक्षमता ह्यांच्यामध्ये असते. ह्यांच्या कर्तबगारीशी देखील हे लोक एकनिष्ठ असतात म्हणून हे आपल्या ध्येयापर्यंत पोहचतात. थोड्या लाजाळू स्वभावाच्या देखील असतात ह्या राशी. ते त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात, हे सगळे असले तरी भावुकता हे त्यांचे वैशिष्ठय असते.
दुसऱ्यांचे दुःख पाहून ह्यांना वाईट वाटते डोळ्यात पाणी येते. अतिशय जिज्ञासू, कर्तबगार, कर्तव्यदक्ष अशी ह्यांची ओळख आहे. कर्क राशींच्या ह्याच गुणांमुळे ह्या राशीच्या लोकांना समाजात मानसम्मान प्राप्त होतो. कर्क राशीच्या मुलींबद्दल जाणून घ्याच झालं तर ह्या मुली एकत्र कुटुंबात अगदी छान सामावून जातात. मातृ प्रेमाचा ह्या जणू आविष्कारच असतात. कर्क राशीचा स्वामी आहे तो म्हणजे चंद्र आहे ह्यामुळेच त्यांना हि भावुकता मिळते. चंद्रामुळेच ह्यांना हि मनाची देखील चंचलता मिळते.
मिनरास, ह्या राशीचे लोक देखील फार भावुक आहेत. ह्या राशीचे लोक देखील खूप बुद्धीवान असतात. बुद्धी आहे मनाच्या दोन्ही मध्ये हे नेहमी मनाचे ऐकतात. आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रेत्येक नात्याला जीवापाड जपण्याचा ह्यांचा हट्ट असतो. दुसऱ्यांच्या भावनेचा अतीविचार करणे मात्र ह्यांच्यासाठी घातक ठरू शकते. दुसऱ्यांना वाईट वाटेल किंवा त्यांना काही ठेस पोहचेल असे ह्यांच्याकडून कधीच होत नाही. एखाद्याला कठोर वाईट साईट बोलणे ह्यांच्या स्वभावातच नसते.
स्वभावाने अगदी साधे सरळ असतात. कपट कारस्थाने ह्यांसाठी त्यांच्या मनात अजिबात स्थान नसते. जे पन मनात आहे तेच त्यांच्या तोंडावर देखील असते. मिन राशीच्या व्यक्ती सामाजिक स्वभाव मिळमिळावु स्वभावाच्या असतात. अतिशय हसऱ्या आणि सर्वाना आपलस करणाऱ्या ह्यांच्या स्वभावामुळेच ते सर्वांच मन जिंकून घेतात.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




