नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या जीवनात काही दुःख असतील, घरात वादविवाद असतील भांडणतंटे होत असतील, घरात नेहमी पैस्याची चणचण राहत असेल, आपल्या तिजोरीत नेहमी खडखडाट राहत असेल तर आपण आजचा उपाय नक्की करा. हा उपाय आपण दररोज करू शकता. उपाय अगदी साधा व सोपा आहे, परंतु प्रभावी आहे. जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसल्यास आपण हा उपाय सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी ह्या आठवड्यातील ३ दिवशी तरी नक्की करावा.
हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो. शुक्र हा ऐश्वर्य व सुखाचा कारक आहे. शुक्र मजबूत असेल तर आपल्यला सुख व ऐश्वर्य प्राप्त होते. हा उपाय केल्याने आपला चंद्र देखील मजबूत होईल चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे, आणि हा मजबूत असेल तर आपल्याला मानसम्मान मिळेल. सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल.
आणि पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून पिठात हि एक वस्तू टाकली तर आपला सूर्य देखील मजबूत होईल. व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल. उपाय अगदी साधा आहे. प्रेत्येकच्या घरात कणिक मळली जाते आणि हीच मळत असताना आपल्याला हि एक वस्तू त्यात टाकायची आहे. प्रेत्येक घराचे किचन हा घराचा आत्मा असतो कारण इथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते. स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी आनंदाने हसत मुखाने देवाचे नाम घेत करावा नाहीतर काही स्त्रिया स्वयंपाक करताना चीडचीड किंवा आदळआपट करतात मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात व ते अन्न खाणाऱ्याच्या मानत तीच तरंगे उतरतात मग घरात वादविवाद होतो.
आज आपण बोलणार आहोत पीठाविषयी, कणिक आपण जेव्हा पण मळतो तेव्हा त्या गोळ्यावर आपण आपली २ बोटे उमटवावीत जेणेकरून त्यावर पित्रांचा किंवा वाईट शक्तींचा असर राहत नाही. त्यामुळे आपण जेव्हा पण कणिक मळाल तेव्हा आपण त्यावर आपले बोटांचे ठसे उमटवावेत त्यानंतरच त्याच्या पोळ्या कराव्यात. आता आपण पाहुयात कि त्यात कोणती गोष्ट टाकायची आहे.
आपण जेव्हा कणिक मळतो तेव्हा आपण त्यात थोडेसे तूप व साखर टाकायची आहे. पोळ्या गोड करायची नाहीत तर अगदी थोडीशी साखर आपण त्यात टाकायची आहे. दररोज स्वयंपाक झाला कि आपण पहिली पोळी गाई ला द्यावी जेणेकरून आपल्याला सर्व देवीदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. दुसरी पोळी त्यातील थोडा तुकडा आपण कावळ्यांसाठी आपल्या गच्चीवर ठेवावा जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील. बहुतेक घरात शेवटची पोळी कुत्र्याला दिली जाते ह्याचे कारण आपल्या मागील अदृश्य शक्ती निघून जाते.
तर ती शेवटची पोळी आपण कुत्र्याला न देता आपण त्याच्या आधीची पोळी कुत्र्याला द्यावी व जी शेवटची पोळी आहे ती आपल्या घरातील गृहिणीने खावी जेणेकरून आपल्या घरात नेहमी भरभराट राहते. आपले घर नेहमी सुख, समृद्धी राहते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




