धार्मिक

पिठोरी अमावस्या का साजरी केली जाते ? काय तआहे त्यामागील कथा नक्की जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यातील अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हण्टले जाते. ह्या अमावस्येस आई आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे आणि आपले सौभाग्य टिकून राहावे म्हणून व्रत करते. मित्रांनो ह्या पिठोरी अमावस्येबबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ह्या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी स्नान करून विधिवत पूजा केली जाते, ६४ योगिणींची आणि शक्तीस्वरूप देवतांची ह्या साठी सर्वोतोभद्र मंडळावर आठ कलशाची स्थापना केली जाते आणि त्यावरती पुर्नपत्रि ठेवून ब्राह्मी माहेश्वरी वाराही, वैष्णवी, कुमारी, इंद्राणी आणि चामुंडा ह्या शक्तिदेवतांच्या मूर्ती स्थपल्या जातात.

सोबतच तांदळाच्या राशींवर ६४ सुपाऱ्या मांडून ६४ योगिनींचे अवाहन केले जाते ह्या ६४ योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त अश्या ६४ कला असतात आणि त्यांचीच हि प्रतीक असतात. अशी संपूर्ण पूजा पार पाडली जाते. अलीकडे ह्या सर्वांची छापील चित्र देखील मिळतात ह्या छापील चित्रांचा वापर करून आपण आपल्या घरात पूजा केली तरी चालते.

ह्या अमावस्येला पिठोरी अमावस्या ह्या साठी म्हणतात कारण ह्या पूजेत जो नैवद्य दाखवला जातो तो नैवद्य करण्यासाठी पिठाचा वापर केला जातो, सर्व प्रकारचे नैवद्य हे पिठाचा वापर करून बनवले जातात म्हणूनच ह्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. विशेषकरून बेदाणे मनुके घालून केलेली भाताची खीर हे ह्याचा खास नैवद्य आहे. खिरीच्या वाटीवर पुरी झाकली जाते लक्षात घ्या वाटीत खीर घेतात व त्यावर परीने झाकले जाते त्यानंतर अशी हि वाटी आई आपल्या खांदयावर घेऊन. अतिथी कोण कोण आहे ? असे विचारते अश्या वेळी आईच्या पाठीमागे मुलांनी उभे राहावे, व मी अतिथी आहे असे बोलावे व ती खिरीची वाटी आपण घ्यावी.

मित्रांनो ह्यामागील संकल्पना खूप घेऊयात. खरं तर पिठोरी अमावस्याला मातृदिन असे म्हण्टले जाते. वंशवृद्धी आणि मुलांची सुखसमृद्धी तसेच मुलांना दिर्घआयुष्य लाभावे म्हणून हा दिन साजरा करतात. तर एक कथा आहे, एक नगर होते आणि त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. श्रावणाच्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. दरवर्षी काय होत असे कि ज्या दिवशी हे श्राद्ध असे त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या सुनेचे पोटात दुखत असे आणि त्यानंतर ब्राह्मण जेवायला बसले कि त्या स्त्रीला बाळंत होई व तिचे मूल मरून जाई.

आणि पोर मारल्यानंतर त्या ब्राह्मणाला उपाशी घरातून बाहेर जावे लागत असे. सलग सहा वर्ष असे झाले आणि सातव्या वर्षी देखील असे घडल्यानंतर तो सासरा रागावला आणि ते मेलेलं पोर त्याने सुनेच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाकलून दिले. तिला म्हणाला कि त्याचा बाप सलग सात वर्ष उपाशी आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या कि जेव्हा आपण श्राद्ध घालतो तेव्हा जे आपले पित्र आहेत ते आपल्या घरी ते अन्न ग्रहण करण्यासाठी आपल्यात येत असतात. मात्र ज्या दिवशी हे श्राद्ध असे त्याच दिवशी त्याची सून बाळंत होऊन तिचे मुलं मरत असे. अश्या वेळी मूल मेलेल्या घरी कोणीही अन्न ग्रहण करत नाही म्हणून सासऱ्याचे म्हणणे होते कि तुझ्यामुळे माझा बाप सात वर्षांपासून उपाशी आहे.

ती रानात गेली ती तिथे गेल्यानंतर तिला अरण्यात झोटिंगा ची बायको भेटली, ती तिला म्हणाली तू बाई इथे काय करत आहेस. लवकर जा कारण माझा नवरा झोटिंग इथे येईल आणि तुझे प्राण घेईल. ब्राह्मणाची सून म्हणाली मी मेले तरी चालेल, तिने सर्व हकीकत तिला सांगितली. तेव्हा झोटिंगाच्या बाईला तिची दया अली व तिने तिला एक रस्ता दाखवत ती म्हणाली तू इथे पुढे जा तुला एक शिवलिंग दिसेल एक बेलाचे झाड दिसेल तिथे तू बसून रहा. रात्र झाल्यानंतर तिथे नागकन्या नागदेवता येतील सती अप्सरा येतील व तिथे पूजा करतील. पूजा झाल्यानंतर खीर पुरीचा नैवद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. त्यांनी असे विचारल्यानंतर अतिथी मी आहे असे म्हण.

त्या तुझी चौकशी करतील, ब्रह्माच्या सुनेनं देखील सर्व सांगितल्याप्रमाणे करते तिने देखील अतिथी कोण आहे असे विचारल्याबरोबर तिने उत्तरले मी आहे. असे म्हणताच सर्व तिथे जमलेले देवता त्यांनी तिची चौकशी केली व त्यानंतर तिझे सर्व ऐकून नागकन्यांनी तिला एक व्रत सांगितले आणि ते व्रत होते ते म्हणजे पिठोरी अमावस्येचे व्रत. त्या देवकन्यांनी तिला सर्व विधिवत पूजा करायला सांगितली आणि ह्या व्रताबद्दल सर्वाना सांग असे देखील सांगितले.

तर तिने विचारले कि हे व्रत केल्यावर काय होईल तर अप्सरा त्यावर म्हणाल्या ह्यामुळे मुलंबाळ दगावत नाहीत ह्यामुळे मुलं सुखा समाधानात राहतात. त्यानंतर ति आपल्या गावात निघाली गावात तिला पाहून गावातले लोक ब्राह्मणाला सांगत गेले कि तुमची सून आलेली आहे. त्यांचा काही विश्वास बसला नाही, नागकन्यांनी तिला आशीर्वाद दिला होता तिची सर्व मुलंबाळ पुन्हा जिवंत झालेली होती. आणि हे सर्व पाहून ब्राह्म्ण खुश झाला तो घरात गेला, घरातून तांदूळ तांब्याभर पाणी आणले. ते आपण सुनेवरून मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून तो घरात आला. सर्व हकीकत तिने सुनेला विचारली व तिने देखील सर्व काही सांगितले.

त्यानंतर ती सुखाने आपल्या मुलांसह राहू लागली, तर अशी होती कहाणी. थोडक्यात पिठोरी अमावस्या साजरी करण्याचा उद्देश असा आहे कि आपल्या मुलबाळंना सुखरूप, दीर्घायुष्य लाभावे ह्यासाठी हि अमावस्या साजरी केली जाते.अश्या प्रकारे मातृदिन साजरा केला जातो.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट