हिंदू धर्मात अनेक महत्वाच्या गोष्टी अनेक विविध महिन्यात येत असतात. आषाढ महिन्यात एकादशी असते तर श्रवण महिन्या पाच सोमवार सर्वजन करतात. श्रवण महिना पूर्ण होतातच भाद्रपद महिना सुरु होतो आणि श्री गणरायाच्या भक्तींत सर्वजण बुडून जातात. आणि श्रींचे विसर्जन होतातच शुक्ल पक्षाची तिथी पूर्ण होतातच कृष्ण पक्षाची तिथी सुरु होते आणि पितृपक्ष म्हणजेच पक्षपंधरवडा सुरू होतो.
Pitru Paksha 2024: पितृपक्ष यावर्षी कधी सुरु होणार
पितृपक्ष म्हणजे पक्षपंधरवडा हा साधरणतः १५ दिवस असतो. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून सुरू होऊन भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला समाप्त होत आणि त्यानंतर नवरात्र सुरु होते. या पंधरा दिवस सर्व सर्वजण हे आपल्या पूर्जनानं श्रद्धांजली अर्पण करतात.
हिंदू धर्मतील मान्यतेनुसार आपले पूर्वज जर का आपल्यावर प्रसन्न असल्यास आपल्या सुख समृद्धी प्राप्त होतेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळताच सर्व कामात यश प्राप्त होते. तसेच घरियातील वातावरण नेहेमीच आंनदी आणि प्रसन्न रहाते. या वर्षी पितृपक्ष १७ सप्टेंबर २०२४ या दिवशी सुरु होणार आहे कारण याच दिवशी प्रोर्णिमा सुरु होणार आहे.
या दिवसात आपण विधी विधी पूर्ण करायच्या असतात जेणेकरून आपले पूर्वज प्रसन्न होतील आणि आपल्या आशीर्वाद देतील. या काळात आपण पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दानधर्म या विधींना सुरुवात करावी. तसेच याच काळात विविध देवी आणि देवतांची पूजा केली वाजते. तसेच आपल्या पूर्वजांची शुद्ध पूजा केली जाते आणि विविध वस्तू दान केली जातात.
या काळात दान धर्माला खुप महत्व दिले गेले आहे. अन्न दान, कपडे आणि भांडी दान केल्यास खुप चांगले मानले जाते. असे केल्यामुळे आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात. अशी मान्यता आहे.
पितृपक्ष श्राद्ध तारखा (Dates Pitru Paksha 2024 )
१७ सप्टेंबर २०२४, मंगळवार – पौर्णिमा श्राद्ध
१८ सप्टेंबर २०२४, बुधवार- प्रतिपदा श्राद्ध
१९ सप्टेंबर २०२४, गुरुवार- द्वितीया श्राद्ध
२० सप्टेंबर २०२४, शुक्रवार- तृतीया श्राद्ध
२१ सप्टेंबर २०२४, शनिवार- चतुर्थी श्राद्ध
२२ सप्टेंबर २०२४, रविवार- पंचमी श्राद्ध
२३ सप्टेंबर २०२४, सोमवार – षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध
२४ सप्टेंबर २०२४, मंगळवार- अष्टमी श्राद्ध
२५ सप्टेंबर २०२४, बुधवार – नवमी श्राद्ध
२६ सप्टेंबर २०२४, गुरुवार- दशमी श्राद्ध
२७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार- एकादशी श्राद्ध
२९ सप्टेंबर २०२४, शनिवार- द्वादशी श्राद्ध
३० सप्टेंबर २०२४, रविवार- त्रयोदशी श्राद्ध
१ ऑक्टोबर २०२४, सोमवार- चतुर्दशी श्राद्ध
२ ऑक्टोबर २०२४, मंगळवार
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




