नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आज आपला समाज हा नवीन विचाराचा आहे, तरीदेखील आजच्या काळात काही असे लोक आहेत जे कि मुलगी झाली आहे म्हणून नाक मुरडतात, मुलगाच झाला पाहिजे, वंशांचा दिवा पाहिजे असतो. त्यांना मुलगी म्हणजे जणू दुसऱ्याचे धन वाटत असते. पंरतु जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी घराची पणती असते, हीच पणती घरात प्रकाश देते. अनेक सुशिक्षित माणसे देवीच्या मंदिरात जाऊन मुलगा होउदे म्हणून नवस करतात परंतु त्यांना हे लक्षात येत नाही कि ते स्त्रीशक्तीसमोर स्त्रीचे अस्तित्व नाकारत आहेत.
मित्रांनो आपण २१ व्या शतकात जगत आहोत, जिथे मुलगा मुलगी असा भेदभाव होत नाही तरीसुद्धा असा भेदभाव झालेला आपण पाहतो. अनेकांना वाटते कि आपल्याला एक तरी मुलगा असायला हवा. मुलगी नसली तरी चालेल पण वंशाला दिवा असायलाच हवा. बऱ्याच ठिकाणी पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा केली जाते. आणि गर्भधारणा देखील केली जाते. पण जर पहिला मुलगा झाला तर दुसरी मुलगी व्हावी अशी अपेक्षा आपण करत नाही ह्याउलट दुसरा देखील मुलगाच व्हावा जेणेकरून म्हतारपणी एक तरी सांभाळ करेल अशी अपेक्षा करतात.
मित्रांनो आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून त्यांची मुलगी आपण घरात आणतो. पण त्या कन्यादानची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणालातरी कन्यादानच करावे लागते. त्यासाठी देखील आपल्याला कन्या असावी लागते. परतफेड केली नाही तर आपण ह्या संसारातून मुक्त होऊ शकत नाही, मुलगा फक्त एक कुळाचा उद्धार करतो पंरतु मुलगी हि तिचे सासर आणि महेर ह्या दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. ईश्वराच्या कृपा ज्यांच्या घरावर असते त्या घरातच मुलगी जन्माला येते.
मुलगी घरात येते ती लक्ष्मी पावलाने घरात येते, मुलगी घरात अली म्हणजे घरात सुख व समृद्धी येऊ लागते. घरातील वातावरण देखील मंगल होते, घरातील मुलींमुळे एक मायेची वेगळीच उब ती तिच्या आईवडिलांना देत असते. असे म्हणटले जाते कि आपल्या कुळात एखादा संत महात्मा जन्माला आला तर त्याच्या मागील किंवा त्याच्या पुढील २१ पिढ्यांचा उद्धार होत असतो. परंतु आपल्याच कन्येच्या गर्भातून संत महात्मा जन्माला आला तर आपला सुद्धा उद्धार होईल असा कोणी विचारच करत नाही.
मुली ह्या मुलांच्या बरोबरीने किंवा जास्त चांगल्या पद्दतीने सांभाळ करतात म्हतारपणची काठी म्हणून मुले नाही तर मुली ताठ मानेने उभा राहतात. मुलींचे आईवडिलांवर प्रेम असते त्यामुळे बऱ्याच गोष्टी पटवून देण्याचे कामदेखील मुलीला पटते. मुलीने सांगितले आणि वडिलांनी ते ऐकले नाही असे कधी होत नाही. आपणास आई, पत्नी, बहीण हवी असते त्यासाठी मात्र मुलगा फक्त असून चालत नाही, तर त्यासाठी मुलगी देखील घरात असायलाच हवी. म्हणून मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलीचे देखील स्वागत करायलाच हवे.
कोणताही भेदभाव न करता त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे गरजेचे आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज मोडीत काढत मुलगी हाच आपला वारसा स्वाभिमान असे मानणारे पालक म्हणजे, समाजात परिवर्तन घडवून आणणारे देवदूतच आहेत असे म्हणावे लागेल. आजकालच्या मुली ह्या राष्ट्रपदावर जाऊन पोहचली आहे. राजमाता जिजाऊ, लक्ष्मीबाई, झाशीची राणी, सुनीता विल्यम, इंदिरा गांधी इत्यादी सर्व मुलीचं होत्या ह्यांना जन्म दिला म्हणून आपला भारत देश घडला आहे. म्हणून मुलीला जन्म देणे हि एक खूप कौतकस्पद बाब आहे. कारण तिच्यातच संपूर्ण विश्व सामावले आहे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




