नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात, तसेच आपण हे पाणी कधी पिणे योग्य किती पिणे हे सर्व माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो मानवी शरीर ज्या अनेक घटकांपासून बनलेलं आहे त्यामधीलच एक घटक आहे कॉपर. आपल्या प्रेत्येक पेशीत तांबे असतेच म्हणून तांब्याच्या पाण्यात पाणी पिल्याने कॉपर म्हणजे तांब्याचा पुरवठा होत असतो.
मित्रांनो लोकांना प्रश्न पडतो कि तांब्याच्या भांड्यातील पाणी नेमकं प्याचे तरी कसे. मित्रांनो तांब्याच्या भांड्यात आपण रात्री झोपण्यापूर्वी ते भांडे भरून घ्या व रात्रभर ते तसेच झाकून ठेवा सकाळी उठल्याबरोबर आपण अमोश्या पोटी काही हि न खाता पिता आपण हे पाणी प्याचे आहे. जेवढी आपली क्षमता आहे मग ते एक ग्लास किंवा एक तांब्याभर असेल आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपण पाणी प्यावे.
मित्रांनो हे पाणी पिणे जितके चांगले आहे तितकेच ते घातक देखील आहे. तांब्याच्या भांड्यात आपण जेव्हा पाणी ठेवतो तेव्हा ते कमीत कमी आठ तास ठेवायला हवे तरच त्याचे फायदे आपल्याला होतात. जर ते १० तासांच्या पेक्षा जास्त वेळ पाणी त्यात ठेवले तर त्या पाण्यातील कॉपर चे प्रमाण वाढते, आणि मग आपल्याला अलझयमर सारखे आजाराला आपण बळी पडू शकतो.
म्हणून लक्षात ठेवा कि आपण तांब्याच्या भांड्यात पाणी १० तासाहून जास्त वेळ ठेवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी आपण सलग ३ महिने सेवन करू शकता, त्यानंतर आपण एक महिना गॅप ठेवून त्या महिन्यात साधे पाणी पियू शकता त्यानंतर आपण पुन्हा ३ महिने तांब्याच्या भांड्यातील पाणी पियू शकता. हा एक नियम नक्की पाळावा वर्षभर आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पियू शकत नाही ३ महिने नंतर एक महिना गॅप ठेवून आपण पाणी प्यावे.
आता पाहुयात फायदे काय आहेत. मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे आपले वाढत चालेले वय जे आहे ते वय ह्या पाण्याने कंट्रोल मध्ये येते. वाढत्या वयानुसार अनेक लक्षणे दिसतात जसे कि केस पिकणे असेल किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे इत्यादी सर्व तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने कमी होतात. कारण ह्या पाण्यामुळे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्याचे काम हे करत असते. परिणामी सुरकुत्या वगैरे येत नाही. दुसरा फायदा म्हणजे ज्यांना चरबी कमी करायची आहे ज्यांना आपल्या पोटाचा घेर कमी करायचा आहे अश्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी नक्की प्यावे.
पाणी शुद्धीकरण हे सर्वात मोठे ह्या पाण्याचे वैशिष्ट्य आहे. हयामुळे पाण्यातील बॅक्टरीया व छोटे छोटे जंतू मरतात परिणामी आपल्याला होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपल्या मेंदू व मज्जासंस्थेस फायदा होतो. परिणामी ज्यांना बौधिक कामे असतात त्यांनी असे पाणी नक्की प्यावे. ज्यांना किडनी आणि लिव्हर ह्यांचा काही त्रास असेल त्यांनी तर नक्की ह्याचे सेवन करावे त्यामुळे अश्या भागातील जंतूंचे नाश हे पाणी करते स्वच्छ बनवते.
एकंदरीत पूर्ण आपल्या शरीरासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायद्याचे ठरते, म्हणून आजपासून आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे सुरवात करा पंरतु ८ ते १० तास इतकेच आणि ३ महिने नंतर एक महिन्याचा गॅप व सकाळी काही न खाता पिता. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




