या वर्षातील पितृ पंधरवडा येत्या काही दिवसात सुरु होत आहे. या दिवसाच्या कालावधीत आपले पितृ या दिवसात पुथ्वी लोकात येतात. जे असे लोक जे आपल्या मध्ये नाहीत. हे पितृ आपल्या घरी येतात कोणत्याही स्वरूपात. काही वेळेस काही सूक्ष्म जिवाणूच्या स्वरूपात, एखाद्या पक्षाच्या किंवा प्राण्याच्या स्वरूपात येत असतात.
या काळात अनेक लोक श्राद्ध करतात. ज्या तिथीला आपले पूर्वज आपल्या सोडून गेले आहेत त्या तिथीला आपण पितृला जेवण घालतो. आपले जे पितृ आहेत त्यांचे एकंदरीत आपल्या जीवनात खुप मोठा परिणाम पडत असतो. आपल्या पितृ दोष आहे असे काही वेळेस सांगितले जाते. कारण पितृ काही कारणा मुळे जर आपल्यावर नाराज असतील तर असे पितृ दोष निर्माण होत असतात.
जर का आपल्याला पितृ दोष असेल तर आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी येतात. सातत्याने कामात अडथळे येणे. कोणतेही काम लवकर होत नाही. घरात काही जण सतत आजारी पडतात. म्हणूनच या दिवसात काही चागले उपाय पण केले तर आपल्या याचा लाभ होऊ शकतो. असे कोणते उपाय आहे हे आपण जाणून घेऊ. व ते कसे करायचे हे जाणून घेऊ.
असा एक उपाय जाणून घेऊ जो केल्याने पितृ दोष कमी होण्यास मदत होईल. या दिवसात एक दिवा रोज सायंकाळी लावणे. जर का हा दिवा रोज लावणे होत नसेल तर कमीत कमी पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आणि जी तिथी आहे आपल्या पितृची या दिवशी नक्की करा. हा उपाय फक्त सायंकाळी कायचा आहे. म्हणजे सूर्य मावळ्या नंतर करायचा आहे.
हा दिवा कोणत्याही धातूचा किंवा कणकेचा असाल तरी चालतो. या दिव्यात तूप किंवा मोहरीचे तेल वापराचे आहे. पितृ लोकांची दिवस हि दक्षिण असते. यामुळे दक्षिण दिशेच्या भिंती कडे हा दिवा लावायचा आहे. ज्या ठिकणी लावणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्या. तसेच हा दिवा लावताना याखाली अक्षदा किंवा एखादी डिश नक्की ठेवा. या दिव्यात अगदी थोडेशे काळे तीळ टाकायला विसरू नका.
या दिव्याचे मुख हे दक्षिण दिशेला असेल पाहिजे. तसेच आपले सुद्धा तोड दक्षिण दिशेला असेल पाहिजे. देवाचे नामस्मरण करून पितृ देवाला नमन कायचे आहे. त्या नंतर आपण आपल्या पितृना प्रमाण कायाचा आहे. आणि प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनात पितृ दोष असेल तर आपल्याला त्या पासून मुक्ती मिळावी. आपल्या घरात सुख समृद्धी, आनंद स्वभाग्य नांदावे. आणि अकरा वेळेस “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप करावा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




