वास्तू शास्त्र

मनी प्लांट मध्ये आजच ठेवा हि एक वस्तू.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो सर्वानाच वाटते कि आपल्याकडे भरपूर धन व पैसा असावा परंतु काहींच्या बाबतीत ह्या गोष्टी खऱ्या होतात तर काहींच्या बाबतीत कितीही मेहनत घ्या कितीही कष्ट करा त्यांचे नशीब काही त्यांना साथ देत नाही. ह्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो आपली आर्थिक परस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो. ह्यामधील च एक उपाय आपण आजच्या लेखात सांगत आहोत.

मनी प्लांट म्हणजेच पैस्याचे रोप हे नावातच बरेच काही स्पष्ट अर्थ सांगून देते, तसेच ह्या झाडाला लक्ष्मी वेल म्हणजे लक्ष्मी प्रदान करणारा वेल असे देखील म्हणतात. मनी प्लांट आपण घरी आणून आपण आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो.

त्याप्रमाणे आपण मनी प्लांट घरी आणतो देखील काहींच्या घरी तर असेल देखील पंरतु ते कोणत्या प्रकारे ठेवायचे तसेच कोणत्या दिशेला ठेवायचे हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला त्याचे फायदे मिळत नाही. मग आपण आपल्या नशिबावर काढतो कि आपले नशीबच खराब आहे, योग्य प्रकारे व योग्य ठिकाणी मनी प्लांट लावून आपण धनासोबत सुख समृद्धी देखील घरात येईल.

मनी प्लांट चे रोप हे दिसायला आकर्षक असल्यामुळे त्याचा वापर आपण सजावटीसाठी देखील उपयोग केला जातो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील घरातच ह्याचे रोप आपण घरात लावतो. चला तर जाणून घेऊयात ह्या मनी प्लांट सोबतच्या काही महत्वाच्या गोष्टी. मनी प्लांट घरात आणताना ते कधीही खरेदी करून अनु नये, तसेच कोणालाही सांगून किंवा विचारून देखील आणू नये.

मनी प्लांट चे रोप जेथे असेल तिथून गुपचूप आपण एक फांदी तोडून आणावीत आणि हो आपण ज्यांच्या घरून हि फांदी तोडून आणत आहोत ती व्यक्ती धनवान श्रीमंत असावीत, त्यांच्या घरात देवाची पूजा करत असणारे कुटुंब असावे. अश्या घरातून फांदी तोडून आपण आणावी. जेणेकरून आपल्या घरात देखील धन सुख समृद्धी येईल.

मनी प्लांट घरात लावल्यानंतर त्याचे एखादे पान तुटले खराब झाले किंवा पिवळे झाले असेल तर ते लगेच काढून टाकावे ते तसेच राहून देऊ नये. मनी प्लांट घरात आणताना गोल व छोट्या छोट्या पानांचे आणावे. खूप मोठ्या पानांच्या रोपामुळे कोणतेही लाभ मिळत नाहीत. कुंडीमध्ये किंवा बाटलीत मनी प्लांट असेल तरीसुद्धा मनी प्लांटच्या मुळ्या कोणाला दृष्टीस पडणार नाहीत अश्या ठेवाव्यात. बाटली असेल तरी त्याला कशाने तरी झाकून द्यावे म्हणजे त्यांच्या मुळ्या कोणाच्या दृष्टीस पडणार नाहीत.

मनी प्लांट पिवळसर किंवा पोपटी नसावे ते नेहमी हिरव्या रंगाचे असावे म्हणजे आपली प्रगती वेगाने होते. जितके वेगाने मनी प्लांट वाढते तितक्या वेगाने आपली प्रगती होते. मनी प्लांट घरातील मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस लावावे आणि त्याचा वेल दरवाजाच्या वरती जाईल, म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना कामासाठी बाहेर पडताना आपल्या डोकयावर मनी प्लांट असावा.

मनी प्लांट च्या कुंडी किंवा बाटलीला लाल रंगाची रिबीन बांधावी त्यामुळे आपल्याला त्याचे दुप्पट फायदे दिसतात. व त्यामुळे आपल्याला हि ते दिसायला आकर्षित दिसते. मनी प्लांट ला पाणी टाकताना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात २ चमचे दूध टाकवे व मग ते पाणी मनी प्लांट वेगाने वाढतो व आपली प्रगती देखील वेगाने वाढते.

तसेच मानले तर खूप आहे नाही तर काही नाही. हे करून पहा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट