वास्तू शास्त्र

घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने काय घडते जाणून घ्या वास्तुशात्रातील फायदे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कि हत्ती हा प्राणी सर्वशक्तीशाली मानला जातो हत्तीला दीर्घायुष्याचे प्रतीक देखील मानतात वास्तुशास्त्राप्रमाणे घरात हत्तीची मूर्ती असल्याचे खूप फायदे असतात. घर असो दुकान किंवा तुमचे ऑफिस असो हत्तीची मूर्ती ठेवणे खूप लाभदायी असते. घरात उत्तरेकडे वरती सोंड केलेला हत्ती ठेवल्याने त्याच खूप जास्त सकारात्मक परिणाम घरावर दिसून येतो.

प्राचीनधर्मग्रंथानुसार घरामध्ये चांदीचा भरीव हत्ती घरात ठेवल्याने घरातील वाईट ग्रहांचा असर कमी होतो. वाईट शक्तींचे रूपांतर चांगल्या शक्तीत होते. घराच्या मुख्य दारावर दोन वर सोंड केलेले हत्ती घराच्या दोन्ही बाजूस लावल्यास घरात प्रेमळ आनंदी वातावरणाची निर्मिती होते व घरात कोणाचाही वाईट नजरदोष लागत नाही.

आपल्या घरातील हॉल मध्ये जर आपण हत्तीच्या कळपाचे चित्र आपण लावल्यास ते कौटुंबिक सुखशांती देवतेक मानले जाते. घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणतंटे होत नाहीत. कुटुंबातील भांडणतंटे मिटवण्यासाठी तिन्हत्तीचे चित्र किंवा मूर्ती पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते परंतु हे असे चित्र ठेवताना घरात विशेष लक्ष द्यावे कि घरात सर्वात मोठा असणारा हत्ती पुढे असायला हवा व त्याच्या मागे उतरत्या क्रमाने बाकीचे हत्ती लावावेत म्हणजे शेवटचा हत्ती लहान असावा असे कळप ठेवणे खूपच फायदेशीर आहे.

बेडरूम मध्ये पांढऱ्या रंगाच्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने पतिपत्नीतील प्रेम वाढीस लागते. कर्जातून मुक्तता मिळवायची असेल तर खऱ्या हत्तीखालून निघावे व त्याच्या पायाखालील माती उचलून ती विहरीत टाकावी ह्यामुळे आपल्यावरील कर्ज असेल तर ते लवकर फिटेल. आपल्याला शत्रूंचे भय असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या माहुताला दान करावे ह्यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होईल.

लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्यावरती प्रसन्न व्हावी असे जर वाटत असेल तर चांदीचा एक भरीव हत्ती तो छोटा असेल तरी चालेल असं तो हत्ती आपण आपल्या तिजोरीत ठेवावा पण लक्षात ठेवा कि त्या हत्तीची सोंड नेहमी वरती असावी असे केल्याने एलीया पैस्यांची आवक वाढेल व देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. आर्थिक परिस्थती वाढेल.

उंच सोंडेचा हत्ती जर आपण आपल्या ऑफिस च्या टेबल वरती ठेवला तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते त्याचबरोबर निर्णय क्षमतेत देखील वाढ होते. जर तुम्ही चांदीचा हत्ती बनवून ठेवला तर आणखी चांगले जर चांदीचा शक्य नसेल तर तुम्ही मारबल दगडाचा पांढरा रंगाचा हत्ती बनवून ठेवला तरी चालेल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट