मित्रांनो नमस्कार, आपल्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत आहे. मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्र हे वैज्ञानिक आधारावर लिहले गेले आहे. आपल्या घरातील सर्व वस्तू ह्या वास्तुशास्त्राच्या आधारावर असतील पण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच जर वास्तू नियमांचे पालन करणारा नसेल तर आपली संपूर्ण वास्तू बिघडते. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार बनवलेले घराचे मुख्य दार घरात आनंद व सुखसमृद्धी आणण्यासाठी खूप मोठे कार्य करते.
धनसंपत्तीचे लक्ष्मीचे व सकारत्मक ऊर्जेचा प्रवेश घराच्या मुख्य दरवाजातूनच होतो आणि जर घराचे मुख्य दार व्यवस्थित असेल तर आपल्या जीवनात येणारी नाकारात्मकता व संकटे घराच्या मुख्य दारावरच्या थांबवली जातात. ह्या सर्वांसाठी काय करावे व काय करू नये हे आपण जाणून घेऊयात. घराच्या मुख्य दारासमोर कधीही चपला बूट ठेवू नयेत आपण नेहमी पाहतो कि घराच्या मुख्य दारासमोर लोक चपला बूट काढून तसेच घरात प्रवेश करतात ह्यामुळे घरात नाकारात्मक शक्ती प्रवेश करतात. म्हणून घराच्या आजूबाजूला एक चप्पल स्टॅन्ड ठेवावे व आपल्या चपला त्यात ठेवाव्यात.
घराच्या मुख्य दरवाजाला कधीही काळा रंग देऊ नये, कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो व नाकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो ह्यामुळे साकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही म्हणून मुख्य दाराला काळा रंग कधीही देऊ नये. घराच्या मुख्य दारासमोर कधीही डस्टबिन केरकचरा ठेवू नये. ह्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही व आपल्या दरिद्रित वाढ होते.
घराच्या मुख्य दाराच्या समोर कधीही काटेरी वृक्ष लावू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते. घराच्या समोर कधीही निरुपयोगी सामान कधीही ठेवू नये. कितीतरी घरासमोर आपण पाहतो कि घराच्या दारासमोर घरातील निरपयोगी सामान ठेवले जाते . हा एक खूप मोठा वास्तुदोष आहे. घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ असावे.
घराच्या मुख्य दारावर कधीही झाडाची साऊली पडून देऊ नये म्हणून ते लावताना नेहमी थोडे दूर लावावे. त्याबरोबरच घराच्या अगदी समोर विजेचा खांब देखील असू नये विजेच्या खांबाची साउली देखील घरासाठी अशुभ असते. घराचा मुख्य दरवाजा उघडताना तो पूर्ण उघडला जावा ह्याची काळजी घ्यावी. दार बंद करताना जर कर्कश आवाज येत असेल तर लगेच तेल टाकावे व तो आवाज बंद करावा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




