फूड

चहात फक्त हे टाका गॅसेस आणि ऍसिडिटी कधीच होणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो चहा सोडणे शक्य नसेल आपल्याला त्याची तलब लागलेली असते. हि जर चहा पिण्याची सवय जर तुम्हाला तशीच ठेवता येईल कोणत्याही दुष्परिणाम न होता उलट तुम्हाला गॅसेस, ऍसिडिटी, कफ ह्यांपासून तुमची सुटकाच होणार आहे. मग आपण चहा मध्ये असे काय टाकणार आहोत ते आज आपण आपल्या आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात. पहिली गोष्ट आपण जी साखर टाकतो ती साखर टाकणे बंद करा पण त्याऐवजी गूळ टाका.

असे का कारण साखर हि मुळातच आमलधर्मी आहे आणि गूळ हा क्षारीय आहे म्हणून आपण सकाळी जेव्हा चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरात सकाळी अगोदरच अमल चे प्रमाण वाढलेले असते. आणि त्यात जर आपण असा साखरेचा चहा पिला तर त्यात आणखी जास्त वाढ होते. आणि मग गॅसेस, ऍसिडिटी, कफ ह्यांचे प्रॉब्लेम आपल्याला सुरु होतात.

तुम्ही साखरेऐवजी जर गुळ मिसळला तर तो क्षारीय आहे त्याचे नेचर बेसिक आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात जे पहिल्यापासून जे ऍसिड आहे ते नॉर्मल न्यूट्रल करण्याचे काम हा गूळ करत असतो. तर हि पहिली गोष्ट आपण साखरेऐवजी गूळ चहा मध्ये टाकायचा आहे. आता आपण चहा मध्ये गूळ टाकतोय म्हणून आपल्याला दूध त्यात टाकता येणार नाही कारण गूळ आणि दुहाचे कधीही पटत नाही. यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि ते एकत्र मिक्स करून चालत नाहीत. काही आजारांवर त्यात दूध मिक्स केले तर चालते परंतु आपल्या रोजच्या चहा मध्ये आपलयाला दूध टाकत असला तर ते टाकता येणार नाही.

तर आपण बिना दुधाचा काळा चहा बनवायचा आहे ज्याला आपण ब्लॅक टी म्हणतो जी कि आपण गूळ टाकून बनवायची आहे. त्यानंतर आपण जरासे लिंबु आपण टाकायचे आहे त्यात त्याचे थोडे थेंब लिंबाच्या रसाचे टाकावेत, ज्यामुळे तो ब्लॅक टी हा न्यूट्रल होईल नाही ऍसिडिक ना बेसिक हा असा चहा आपण पिल्याने आपल्याला ह्याचे कमी तोटे होणार आहेत आणि प्लस आपल्याला गॅसेस, ऍसिडिटी, कफ ह्यापासून आपल्याला सुटका मिळेल.

हे पण वाचा :-  व्हेगन डाएट म्हणजे नक्की काय. त्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात जाणून घेऊ.

तर अश्या प्रकारे आपण चहा बनवा आणि प्या जो कि आपल्या शरीरासाठी चांगला आहे आणि जे चहापासून आपल्याला नुकसान होते ते हि अश्या चहा ने होणार नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.