धार्मिक

२४ जानेवारी:पुत्रदा एकादशी ला प्रेत्येक आई ने आपल्या मुलाला ह्या पद्धतीने नक्की ओवाळावे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आताच्या येत्या रविवारी वर्षातील सर्वात मोठी एकादशी येत आहे हि आहे पुत्रदा एकादशी. हि विशेषतः माय लेकाच्या नात्यातील एकादशी म्हणतात ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलासाठी व्रतवैकयल्या करतात किंवा काही महिला पुत्रप्राप्ती साठी देखील व्रत करतात. ह्या दिवशी पुत्र प्राप्तीसाठी महिला व्रत करतात उपाय करतात विष्णू व लक्ष्मी देवतेची पूजा अर्चना करतात. हा दिवस खूप आई साठी खूप महत्वाचा असतो. आई हि आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी सुख कल्याणासाठी व्रत करते. त्याचा चंगल्या भविष्यासाठी प्रार्थना करते म्हणूनच ह्या एकादशीचे महत्व खूप आहे. देवाला पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करते.

ह्या दिवशी म्हणजेच २४ जानेवारीला पुत्रएकादशी निमीत्त आपल्या मुलाच्या प्रगती व भविष्याचा वाटचालीसाठी आई ने अश्या पद्धतीने नक्की ओवाळावे कारण हा दिवस आई आणि मूलाचा दिवस असतो. तर २४ जानेवारीला संध्यकाळच्या तिनसांच्या वेळी ह्या आपल्या घरातील देवघराच्या ठिकाणी आपण एक दिवा लावायचा आहे. दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही असेल तरी चालेल. आणि त्यासोबत हळद आणि कुंकू व अक्षदा ताटात घ्यायचा आणि त्यात ताटात आणखी एक गोष्ट म्हणजे २१ रुपये किंवा ५१ रुपये तुम्हाला जे वाटेल तेवढी रक्कम ताटात ठेवा, आणि आता आपल्या मुलांना एका पटवर्ती ओवाळवण्यासाठी बसवा पाट अश्या दिशेने ठेवा कि जेणेकरून मुलांचे तोंड देवाच्या दिशेने असेल. नंतर त्यांना ओवाळावे. त्यावेळी कुंकवाचा टिळा त्यांचा कपाळाला लावावं महहणजे नाम ओढावा त्यावर अक्षदा लावाव्यात व अक्षदा डोक्यवर्ती देखील टाकवयात व जी दक्षिण चे पैसे तुम्ही ताटात ठेवले आहेत ते तुम्ही ७ वेळा त्यांचा डोक्यवरून ओवाळावी तेही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळावे. आणि ती ओवाळलेली दक्षिणा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावी किंवा एखादया मंदिरातील दानपेटी मध्ये टाकावेत. किंवा त्याचा प्रसाद घेऊन लहान मुलामध्ये वाटावा. पण ते पैसे तुम्ही घरात ठेऊ नका.

अर्थात रात्री तुम्हाला अशी कोणती व्यक्ती मिळेल नाही मिळेल म्हणून त्यादिवशी जरी नाही जमले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी का होईना ते पैसे तुम्ही दान करा .ते तुम्ही खर्च करू नका दानच करा.अश्या पद्धीतीने तुम्ही पुत्रएकादशीनिमत्त आपल्याला मुलाला ओवाळवं ज्याने करून त्यांची भविष्य प्रगतशील होईल.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट