लाईफस्टाईल

२२ ऑगस्ट श्रवण पौर्णिमा रक्षाबंधन जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त.

मित्रांनो आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे, मित्रांनो प्रेत्येक वर्षीप्रमाणे ह्याहीवर्षी आलेला सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण बहीण भाव ह्या सणाची वाट आतुरतेने पाहत असतात तो सण २२ ऑगस्ट रविवारी आलेला आहे ह्यादिवशी प्रेत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळेल आपल्या भावाच्या हातात राखी बांधून आपल्या भावाला आपल्या रक्षणासाठी सांगेल.

मित्रांनो हा दिवस प्रेत्येक भाऊ आणि प्रेत्येक बहिणीसाठी महत्वाचा मानला जातो. आपण आपल्या आजच्या लेखात २०२१ सालच्या रक्षाबंधन कोणत्या वेळी साजरे करावे. बाहिनेने आपल्या भावाच्या हातात राखी केव्हा बांधावी जेणेकरून ह्या रक्षाबंधनाचे फळ दोन्ही बहीण आणि भाऊ दोघांना मिळेल.

मित्रांनो पौर्णिमा तिथीची सुरुवात हि आदल्याच दिवशी शनिवारी संध्यकाळी ७ वाजता होत आहे. आणि हि श्रवणी पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:३७ मिनिटांपर्यंत असेल. रक्षाबंधनाचा विचार करता २२ ऑगस्ट दिवशी पौर्णिमा हि पूर्ण पौर्णिमा असेल सूर्योदय व्यापिनी पौर्णिमा असेल म्हणून रक्षाबंधन हे २२ ऑगस्ट दिवशी साजरा केला जाईल.

ह्या दिवशी शुभ मुहूर्त आहेत त्यापैकी पहिला शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत. हा अतिशुभ मुहूर्त आहे, त्यानंतर दुसरा शुभमुहूर्त आहे तो म्हणजे १:३० ते ३ वाजेपर्यंत आणि तिसरा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०:३० वाजेपर्यंत आहे. असे हे तिन्ही मुहूर्त शुभ मानण्यात आले आहेत.

ह्या रक्षाबंधनाचे महत्व असे कि शोभनयोग हि ह्यावेळी जुळून आला आहे. एकतर श्रावण पौर्णिमा तर आहेच त्याचबरोबर शोभनयोग जो आहे तो जुळून आल्यामुळे प्रेत्येक बहिणीने आपल्या भावाला मनोभावे ओवाळावे. ह्या पवित्र वातवरणात नवीन अलंकार व वस्त्र धारण करून पूजेची थाळी तयार करून आपल्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडून तोंड करून पाटावरती बसायला सांगावे. भावाला टिळक लावावा त्याच्या डोक्यवरती टोपी किंवा रुमाल ठेवावा आणि त्यानंतर त्याला आपल्याहीकडे जी रीत आहे प्रथा आहे त्याप्रमाणे ओवाळावे, व नंतर आपण त्याच्या उजव्या हातावर राखी बांधावी.

त्यानंतर आपण ह्या एक मंत्र बोलवा हा मंत्र आहे ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल।। तर बाहिनेने आपल्या भावाला राखी बांधताना बोलवा. ह्याचा अर्थ असा होतो कि हि जी मी राखी बांधत आहे हि महान शक्तिशाली दानवीर राजा बली ह्याला बांधली गेली होती माता लक्ष्मी कडून आणि माता लक्ष्मीचे रक्षण करायचे वचन हे बलीने दिले होते त्याचप्रमाणे तूसुद्धा माझे रक्षण कर असा हा मंत्राचा अर्थ आहे.

राखी बांधून झाल्यानंतर आपण त्याला गोडधोड खाऊ घालायचे आहे. राखी बांधून झाल्यानंतर आपण एकत्र जेवण करा. अश्या पद्धतीने आणखी तुमच्या भागात कशी रक्षाबंधन साजरी केली जाते हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट