घरगुती उपाय

कानातील मळ काढा अगदी सोप्या उपायाने, कानदुखी झटक्यात होईल बरी

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो फक्त ह्याचे २ थेंब कानात टाका हात न लावता कानातील मळ बाहेर निघेल, सोबतच कान फुटणे, कानातून पाणी येणे, कान दुखणे, कानातून कमी ऐकायला येणे अश्या बऱ्याच समस्यावर हा गुणकारी उपाय आहे. ह्याचे साहित्य अगदी सहज उपलब्ध होणारे घरीच असणारे आहे. कान हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपला कान दुखत असेल किंवा त्रास होत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. नाहीतर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात, किंवा ऐक्यनाची शक्ती कमजोर होऊ शकते. म्हणून कानातील मळ हा वरच्या वर काढला पाहिजे कान स्वच्छ ठेवला पाहिजे. कानातील मळ हा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे पातळ तो सहज निघतो आणि दुसरा म्हणजे घट्ट स्वरूपाचा साठून साठून वाळलेला असतो तो सहजासहजी निघत नाही. अश्या दोन्हींसाठी आपण उपाय पाहणार आहोत.

साधारण कान साफ करण्यासाठी इअर बड चा वापर केला जातो हा जर आपण अंघोळ केल्यानंतर जर त्याचा वापर केला तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर आपण कपभर पाणी कोमट करून त्यात चिमूटभर मीठ टाका व त्या पाण्याचे आपण २ ते ४ थेंब आपण आपल्या कानात टाका व नंतर आपण कॉटन बॉल ने आपण आपला कान स्वच्छ करून घ्या ह्याने देखील आपला कान स्वच्छ निघतो.

तसेच कांद्याचा रस आपण कानात टाकला तरी कानातील मळ बाहेर निघतो. मात्र घट्ट मळ असेल तर तो सहजासहजी निघत नाही त्यासाठी आपण आजच्या लेखात एक उपाय पाहणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणारे आहे ते म्हणजे तिळाचे तेल, जर हे तेल तुम्हाला मिळाले नाही तर त्याऐवजी आपण मोहरीचे किंवा बदाम तेल वापरू शकता.

ह्यातील कोणतेच तेल नसेल तर आपण खोबरेल तेल वापरू शकता. साधारण आपण ह्या उपायासाठी २ चमचे तेल घ्यचे आहे. आता ह्यात जो दुसरा घटक आपण घेणार आहोत ते म्हणजे लसूण पाकळ्या. लसूण हा कानासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हयाने जे आहे तुमचा कान ठणकणे लगेच थांबू शकतो.

लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या चुरून आपण कापसाच्या बोळ्यात ठेवून तो कापूस आपण कानात ठेवायचा त्यामुळे आपली कानदुखी लगेच थांबते. आजच्या उपायासाठी आपण जे लसूण आणि तेल घेतले आहे त्यात आपण आणखी एक घटक आणखी घेत आहोत ते म्हणजे. कांदा एक अगदी थोडा कांदा चिरून आपण तो ह्या तेलाच्या आणि लसणाच्या मिश्रणात टाकायचे आहे व ह्या सर्वाला आपण गॅस वरती कमी आच ठेवून गरम करायचे आहे. मिश्रण हे चांगले भाजल्यानंतर आपण गॅस बंद करून आपण थोडे मिश्रण आहे ते कोमट होऊन द्यावे.

कानातील कोणतेही मिश्रण असू ते टाकायचे असेल तर ते कोमट स्वरूपातच टाकावे. मित्रांनो आपण बनविलेले जे मिश्रण आहे ते आपण आता गाळणीच्या साहाय्याने गाळून त्यातील भाजेलला कांदा व लसूण आपण वेगळा करायचा आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण ड्रॉप्लेट्स च्या साहाय्याने आपण आपल्या मळ साचलेल्या कानात टाकायचे आहे. ते कानात साधारण १० मिनटे ठेवून त्यानंतर आपण कापसाने आपला सर्व कान स्वच्छ करा ह्यामुळे आपल्या कानातील सर्व मळ निघून जाईल.

कान दुखणे बंद होईल, तसेच कानाची ऐकण्याची क्षमता देखील वाढेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट