नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घराची लक्ष्मी हि घरातील महिला असते घरातील स्त्रीचा मानसम्मान करणे म्हणजे देवी लक्ष्मीला मान दिल्यासारखेच आहे. आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितले गेले आहे कि जिथे स्त्रीचा मानसम्मान केला जातो तिथे श्री हरी विष्णूचा वास असतो म्हणून घरातील स्त्रीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून घरातील स्त्री कोणतेही काम करते तेव्हा तिच्या कामावरून सकारत्मक किंवा नकारात्मक असा परिणाम आपल्या घरावर पडत असतो. म्हणून घरातील महिलेला कोणत्या हि प्रकारचा त्रास होणार नाही कष्ट होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात नारीपूजनाला खूप महत्वव दिले आहे.
वर्षभरात ४ नवरात्री असतात ह्यातील २ नवरात्री ह्या गुप्त असतात व २ ह्या सर्वानाच माहिती आहे. म्हणून घरातील स्त्रीचे पूजन करणे श्रेष्ठ मानले जाते. एक सुखी परिवार तोच मानला जातो जिथे पती पत्नी आपला जीवन हसत आनंदात घालवतात. अश्या घरात बहुदा अडचणी नसतातच. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि हि ४ कामे ज्या महिला करतात त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि वैभव व ऐश्वर्य आणि समृद्ध आयुष्य त्या घरातील लोक जगतात. असा एक श्लोक आहे कि पत्नी घरात जी कामे करते त्या प्रमाणेच घरात फळ प्राप्ती होते. घरातील स्त्री जर गुणवान असेल चरित्रवान असेल आणि आपल्या कुटुंबाचे हित बघणारी असेल तर तिच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे कधीच संकटे येत नाहीत.
घरातील स्त्रीचे हे आद्य कर्तव्य आहे कि आपल्या घरातील गुप्त गोष्टी वीक पॉईंट असतील ते काहीही झाले तरी घराबाहेर जाऊ देऊ नयेत, अश्या गोष्टी गुप्तच ठेवाव्यात. दुसरी गोष्ट हणजे सकाळची वेळ हि भगवंतांच्या भ्रमणाची वेळ असते अश्या वेळी सर्व देवीदेवता पृथीवरती निवास करतात. म्हणून अश्या वेळीपूर्वी घरातील स्त्रीने घराची स्वछता केली आणि सकाळी सकाळी तुळशीला पाणी अर्पण केले व रविवारी हळदमिश्रित पाणी सूर्यनारायणाला अर्पित केले तर अश्या घरात मान सम्मान यश असे सर्व काही येत असते. त्याशिवाय अश्या घरात राहणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमी आनंदी असतात.
रात्री झोपण्यापूर्वी घराची स्वछता करावी उष्टी खरकटी भांडी ठेवू नयेत. अगदीच रात्री भांडी घासून ठेवणे जमत नसेल तर ती भांडी विसळून तरी एक बाजूला ठेवून द्यावीत. ज्या घरात स्त्रिया हे कार्य करतात त्यांच्या घरात कधीच नाकारत्मकता प्रवेश करत नाही. व घरात आजारपण, वाईट शक्ती ह्या सर्व दूर राहतात. ज्या घरात पैसे सांभाळ स्त्रीच्या हातात असतो त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण घरची स्त्री हि गृहलक्ष्मी असते व लक्ष्मी हि दुसऱ्या लक्ष्मीसोबत खूप आनंदात राहते. स्त्रियांना पैस्याचे महत्त्व असते. त्या पैसा जपून वापरतात म्हणून घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही. ज्या घरात स्त्रिया नेहमी हसतमुख असतात. त्या घरात देवी लक्ष्मीचा नेहमीच वरदहस्त असतो. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




