सध्या जागतिक स्तरावर चर्चा एकाच गोष्टीची चालू आहे. ती म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातिला युद्ध. यामध्ये बरेच देश युक्रेन सोबत असले. तरी एक प्रश्न सर्वांच्या मनात येतो तो म्हणजे इतका मोठा देश रशिया जरी असला तरी युक्रेन त्याना का हवा आहे. इतक्या छोट्याश्या देशा वर रशिया दडपशाही का करत आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केलेल्या विधानामुळे बरेच देश चिंता करत आहे. काही दिवसा पूर्वी त्यानी एक विधान केले होते युक्रेन हा देश कधी अस्तित्वात आलेला नव्हता. या विधानामुळे जवळ पास हे निश्चित झाले होते काई युद्ध कधी हि होऊ शकते. पुतीन यांनी असे विधान आधी सुधा बऱ्याच वेळेस केले होते. पण या वेळेस ते युद्धाच्या भाषेवर बोलत आहे.
पुतीन हे ज्या वेळेस राजकारणात आले होते त्या वेळापासून युक्रेन या देशाबद्दल बोलत आले आहेत. हा वेगळा देश नसून रशियाचा भाग आहे. असे ते बऱ्याच वेळेस बोलत असतात. हा एका छोटासा देश पुतीन याना का हवा आहे. या देशावर पुतीन इतके का चिडून असतात. हा देश रशियात त्याना का समावेश करून घ्याचा आहे.. या सर्व प्रश्नांची उत्तरे थोडक्यात जाणून घेऊ.
रशिया किंवा पुतीन हे इतके आक्रमक का आहेत. याचे उत्तर मिळेल इतिहसात. रशिया युक्रेन आणि बेलारुस यांचा जन्म किवान रुसमधून झाला आहे. असा इतिहास सागितला जातो. किवन रुसचे अस्तिव हळू हळू समाप्त होत गेले आणि त्या ठिकणी वेगवेगळ्या सत्ता अस्तित्वात आल्या त्यामुळे बऱ्याच प्रमाणत युक्रेन विभागला गेला.
त्यानतंर सतराव्या शकत रशियन साम्राज्यात युक्रेन पुन्हा रशियात समावेश केला गेला. कालांतराने राजे शाही समाप्त होत अली आणि त्या ठिकाणी सोव्हिएत युनियन उदयास आले एकोणीशे बावीस (१९२२) मध्ये आणि त्या वेळेस युक्रेन हा संघराज्याचा एक सदस्य देश होता. जवळ पास पासष्ठ वर्षा पेक्षा जास्त काळ हे दोन देशा एकत्र राहत होते.
या काळात सुद्धा बऱ्याच समस्या या दोन देशा मध्ये सतत चालू होत्या. यामुळे बऱ्याच गोष्टी मध्ये नाराजी वाढत गेली. इतर देशा मध्ये वाढत गेलेली गरिबी. तसेच शीत युद्धाचे दुष्परिणाम आणि साम्य वाद मागे जाऊन नवीन विचार सरणी यामुळे १९९१ मध्ये बरेच देश या संघराज्यातून बाहेर पडले आणि अनेक देश उदयास आले.
हिच खंत पुतीन यांच्या मनात घर करून गेली होती. यामुळे का असेना पुतीन सुद्धा युक्रेन मध्ये असलेले रशियन भाषा बोलणारे नेते याना नेहमी मदत करत आले आहेत. यामुळे काही वर्षा पूर्वी युक्रेन मधील काही भाग वेगळा होऊन रशिया मध्ये सामील झाला होता. आता सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




