लाईफस्टाईल

सकाळी सकाळी तुळशीला पाणी अर्पण केल्याने काय घडते.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत कि सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे त्याप्रमाणे आपण करतोही. धूप दीप लावून हात जोडून प्रार्थना देखील करतो परंतु तुम्हाला असे कधी वाटते का कि इतर झाडांना एवढे महत्वव नाही तर तुळशीच्या झाडाला एवढे महत्वव का.

तुळशीचे पूजन आपण दररोज केले तिला पाणी आपण अर्पण केले तर काय घडते. आपल्या आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत कि तुळस नेमकी कोण आहे तिचे एवढे महत्वव काय आहे, तसेच तिला पाणी अर्पण करण्याचे धार्मिक व वैज्ञनिक कारण काय. मित्रांनो एक कथा आहे, जालिंदर नावाचा एक पराक्रमी एक राक्षस होतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधुसंताना पार त्राही करून सोडले होते. त्याला कशे रोखायचे असा प्रश्न सर्वाना पडला. मग सर्व देव श्री हरी विष्णूंनकडे जाऊन त्यांना जालिंदरपासून रक्षा करण्याची विनंती केली.

श्री हरी विष्णूंनी त्या वेळी जालिंदराची माहिती काढली तर त्यांना कळले कि त्याची पत्नी वृंदा हि पतिव्रता आहे तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यांनेच तो विजयी होत आहे त्याला पराजित करायचे असेल तर तिच्या पातिव्रताच्या भंग करणे हाच उपाय आहे ते करण्यासाठी कोणीही पुढे धजावत नाही आखिर ते करण्याची जबाबदारीही श्री हरी विष्णू स्वीकारतात जालिंदरचे रूप धारण करून ते त्याच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून ती त्यांना आलिंगन देते. तिच्या पातिव्रताचा भंग होताच जालिंदरचा मृत्यू होतो.

देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटून वृंदाच्या समोर येऊन पडते हे सर्व पाहून ती चकित होते श्री हरी विष्णूंना ती विचारते तू कोण आहेस, त्यावेळी श्री विष्णू आपले खरे रूप प्रकट करतात. संतप्त झालेली वृंदा तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलादेखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा श्राप ती देते.

हे पण वाचा :-  आपले मुल म्हणून आपल्या जीवनात कोण येतं. माहित आहे का तुम्हाला.

भगवंत तिची शमा मागतात, तू मला भ्रष्ट केलेत आता मला कोण स्वीकारेल. त्यावेळी भगवंत तिला म्हणतात मी तुला स्वीकारेन. एवढेच नव्हे तर जे कोणी तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी देखील कृपा असेल. त्यानंतर ती सती जाते. तिच्या शापामुळेच रॅम अवतारात त्यांना सीतेचा विरह सहन करायला लागला.

देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात, ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले. हीच ती तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी हि तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हणले जाते. तीच तुळस पांडुरंगाने कृष्णाने धारण केली आहे, तिला भगवंतानी स्वीकारले आहे ह्याचे प्रतीक म्हणून शालिग्रामचा विवाह हा तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत कृपा करतात अशी श्रद्धा आहे. हे झाले धार्मिक महत्वव आता पाहुयात वैज्ञानिक महत्व.

सगळ्या वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन मोनोऑक्ससईड सोडते अपवाद फक्त पिंपळ म्हणूनच भगवान श्री कृष्णांनी म्हणले आहे किसर्व वृक्षात मी आश्वस्त म्हणजेच पिंपळ आहे, मात्र तुळस हि अशी जगातील एकमेव वनस्पती आहे जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन मोनोऑक्ससईड व पहाटेच्या वेळी फक्त ०. ० ३% ओझोन वायू सोडते.

व ह्या वायूच्या संपर्कात आल्यास मानवाच्या मेंदूत सेरॉटेनिन स्रवते ज्यामुळे मनुष्य संपूर्ण दिवसभर फ्रेश व आनंदमयी राहतो . तसेच त्याची प्रतिकारशक्ती वाढते. त्याला कोणतेही रोग होत नाहीत. तुळशीच्या सर्व भागांचा उपयोग औषधी म्हणून होतो. म्हणूनच आपण पहाटे तुळशीला पाणी घालावे.

ज्याच्या घरी तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  २ वस्तू मूठभर खायला द्या, जोरात उंची वाढेल मुलांचा सर्वांगीण विकास होईल.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.