नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या लेखामध्ये अशी ३ कामे सांगणार आहोत जी आपण सायंकाळी करू नयेत जी कामे आपल्या घरात माता लक्ष्मीला घरात टिकून देत नाहीत. मित्रांनो प्रत्येक काम करण्याची एक ठराविक वेळ असते आणि ते काम आपण त्याचवेळीस केले तर आपल्याला त्याचे शुभ फळ मिळते. पण तेच काम अवेळी करण्यात आले तर त्याचे तोटे मात्र होतात. संध्यकाळी आपल्या हातून अशी काही कामे होतात कि ज्यामुळे माता लक्ष्मीचे घरातील वास्तव्य संपते ती घरातून निघून जाते. त्यामुळे आपल्या घरात पैसे टिकत नाहीत आणि गरीबी निर्माण होते. चला तर पाहुयात ती तीन कामे कोणती आहेत.
मित्रानो त्यातील पहिले काम म्हणजे, आपण दररोज सायंकाळ झाली कि प्रेत्येक हिंदू धर्मीय गृहिणी आपल्या घरातील देवघरात तसेच तुळशी समोर एक दिवा लावत असते. सायंकाळची वेळ हि माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. माता लक्ष्मी पृथ्वी तलवार भ्रमण करण्यासाठी निघालेली असते आणि ज्या घरात अश्या प्रकारे देवघरात व माता तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरात ती नक्की प्रवेश करते. ती त्या घरात आल्यामुळे घरात सुखसमृद्धी घरात नांदते.
मित्रांनो तर तुळशीजवळ दिवा लावताना काही चुका होतात जसे कि दिवा लावत असताना तुळशीला आपला स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. काही विशेष प्रसींगीच जसे काही उपायांसाठी तिची पाने तोडावे लागणार असतील तर त्यावेळी फक्त आपण हाथ लावावा इतर वेळी आपण तिला स्पर्श करणे टाळावे विशेषतः सांध्यकाळनंतर.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण विनाकारण तुळशीची पाने तोडू नये त्यामुळे तुळशी माता अप्रसन्न होते लक्षात घ्या कि तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करतात आणि ती विष्णुप्रिय असते. मित्रांनो आपण तिला वेळच्या वेळी पाणी घालावे. तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. बऱ्याचदा खूप घरातील स्त्रिया किंवा इतर कोणी घरात सूर्य मावल्यानंतर झाडायला सुरवात करतात.
मित्रांनो हिंदुधर्मशास्त्रानुसार सायंकाळी सूर्य मावल्यानंतर झाडायला मनाई आहे. वास्तुशास्त्र असे मानते कि ह्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. घरातील सकारात्मकतेचा नाश होतो म्हणून आपण अश्या प्रकारची झाडलोट केल्याने माता लक्ष्मी घरातून निघून जातात. आपल्याला झाडलोट करायचीच असेल तर ती आपण सूर्यास्त होण्यापूर्वी करून घ्यावी.
मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्यचश्या घरामध्ये अनेकदा स्त्रियांचा अपमान केला जातो. घरामध्ये सतत आदळआपट सुरु असते. मित्रांनो सायंकाळची वेळ हि आमटे लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि म्हणनून अश्या वेळी जर आपल्या घरातील स्त्रीचा अपमान होत असेल तर माता लक्ष्मी क्रोधीत होते, आणि ज्या घरात स्त्रियांचा मन राखला जात नाही त्या घरात ती कदापिही राहत नाही.
तसेच मित्रांनो घरात भांडणे सुरु असतील तर अशांती तसेच नकारत्मक वातावरण निर्माण होते. म्हणून घर नेहमी आनंदमय कसे राहील ह्याकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील लहान मुलांना शुभम करोति सारखे स्वांस्कारिक श्लोक बोलावेत.मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




