मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आजच्या लेखात श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीला करायचा हरिद्रा गणपतीचा करायचा उपाय आपण सांगणार आहोत. ह्या उपायाने आपल्या शत्रूंचा सफाया होऊन जाईल आपल्या जीवनातील शत्रूबाधा दूर होईल व आपले जीवन सुखमय व सरळ होईल. मित्रांनो आजचा उपाय खूप खास आहे, कारण हा श्रवण महिना हा अत्यंत खास असतो आणि त्यातील काही विशेष तिथी ज्या असतात त्या तिथींना केलेले उपाय आणखी जास्त उपयुक्त व फायदेशीर असतात.
श्रवण महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ह्या दीवशी गणपतीच्या विशेष रूपाचे शास्त्रात एक निदान सांगितले आहे. शास्त्रानुसार गणपती हे चतुर्थीचे स्वामी मानले जातात. भविष्यपुराण, कृतकल्पतरू, चिंतामणी, अश्या शास्त्रांमध्ये गणेश चतुर्थी म्हणून ह्या संकष्टीला संबोधले गेले आहे. मित्रांनो संकष्टी चतुर्थीला ह्या हरिद्रा गणपतीचे निदान आहे. हरिद्रा म्हणजेच हळद जी आपण जेवण बनवताना भाज्यांमध्ये टाकतो.
पौराणिक मान्यतेनुसार माता त्रिपुर सुंदरीच्या द्वारे स्मरण केले गेल्यानंतर हरिद्रा गणेश प्रकट होऊन भाण्डासूर्यदैत्य ह्याने केल्या गेलेल्या अभिचार यंत्राला नष्ट केले गेले होते. जितक्या प्रकारचे तांत्रिक उपाय असतात ते हरिद्रा गणपती अगदी काही क्षणात नाहीसे करून टाकतो म्हणून आपल्या आपल्यावरती कोण्ही कसलाही तांत्रिक उपाय करू दे मग ते सर्व प्रयोग हरिद्रा गणपतीचा उपाय नष्ट करून टाकतो.
मित्रांनो हरिद्रा म्हणजे हळद, तंत्रशास्त्रानुसार हरिद्रा गणपती माता बगलामुखीचें अंगदेवता आहेत, ह्या मातेचे पूजन हे ह्या गणपतीशिवाय होऊ शकत नाही. मित्रांनो आपण पहिले असेल कि विवाहासारख्या कार्यामध्ये हळद खेळतात ह्याचे कारण असते कि विवाहासारख्या कार्यातून सर्व अमंगल दूर होतात. हळद हि फारच शुभ व विघ्न्नाशक मानली जाते. बरेच लोक एखाद्या महत्वाच्या कामाला जाण्यापूर्वी आपल्यासोबत हळद एकाद्या कागदात बांधून घेऊन जातात कारण त्यांचे कार्य संकटे न येत पूर्ण व्हावे म्हणून.
मित्रांनो हरिद्रा गणपतीला अत्यंत शुभ मानले जाते. हरिद्रा गणपतीचे स्वरूप फारच निराळे आहे, त्यांचा रंग पिवळा असून त्यांनी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले आहेत. सुवर्णमुकुट आणि सुसज्जित असे त्यांचे रूप आहे. हरिद्रा गणपतीचे पूजन हे पिवळ्या रंगाच्या वस्तुनीच केले जाते जसे कि जर आपण तुपाचा दिवा लावला तर त्या तुपात देखील हळद टाकली जाते त्यांना पिवळ्या रंगाची फुले जसे कि कणेरी वाहिली जाते. त्यांना नैवेद्य म्हूणन बेसनाचे लाडू अर्पण केले जातात. हळदीने टिळक केला जातो.
उपाय म्हणून आपण हहा दिवशी आपण पिवळ्या रंगाची चपटी बनवायची आहे, म्हणजेच काय करायचे आहे कि पीठ मळताना आपण त्यात थोडीशी हळद टाकून ती मळायची आहे. किंवा आपण बेसन पिठाची देखील चपाती बनवू शकता. त्यानंतर आपण आपल्या उजव्या हाताची पहिल्या बोटाने तर्जनीने मधात बोट भिजवून त्याने आपण आपल्या शत्रूचे नाव त्या चपातीवरती लिहायची आहे व ती चपाती आपण गणेशाला अर्पण करायची आहे. त्यानंतर हि चपाती आपण पिवळसर रंगाची छटा असलेल्या गाईला खाऊ घालावी.
त्याचबरोबर आपण आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे. ओम हूं गं गल्लोम हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजण हृदये स्तंभय स्वाहा. मित्रांनो हा मंत्र एकदम न चुकता म्हणावा. मित्रांनो ह्या उपायाने आपले शत्रूदेखील मित्र बनून जातील. फारच साधा व प्रभावी उपाय आहे तुम्हाला तुमचे शत्रू जे काही त्रास देत असतील ते सर्व ह्या उपायाने बंद होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




